बीड
31 ऑगस्ट भटके-विमुक्त दिनानिमित्त बीड जिल्ह्यात पूर्वतयारी बैठक संपन्न

जिल्हातील भटके विमुक्त समाज बांधवानी सहभागी व्हावे- ओमप्रकाश गिरी
बीड, दि. 28 ऑगस्ट 2025: -महाराष्ट्र शासनाने 31 ऑगस्ट हा दिवस भटके-विमुक्त दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, याचे भटके-विमुक्त बांधवांकडून उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी बीड जिल्ह्यात भटके-विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून एका पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीला भटके-विमुक्त विकास परिषदेचे देवगिरी प्रांत संयोजक उमेश जीजोगी, डॉ. सुभाष जोशी, श्री महंत दत्ता महाराज गिरी, भटके-विमुक्त मित्र मंडळाचे बालाजी पवार, डॉ. कैलास जी पैठणकर, अतुल जी घोरड, जिल्हा संयोजक ओमप्रकाश गिरी, अक्षय तट, संध्या राजपूत, प्रीत कुकडे, राजेंद्र बन साहेब,जिल्हा अभियान प्रमुख बबन जी गिरी, भगवान पवार, बाजीराव गिरी, अनघा प्रकाश, उत्तम गायकवाड, नेहा माळी यांच्यासह परिषदेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत 31 ऑगस्ट रोजी भटके-विमुक्त दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी पूर्वनियोजन करण्यात आले. शासनाच्या विविध विभागांमार्फत भटके-विमुक्त समाजासाठी उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती देण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच, आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड आणि जात प्रमाणपत्र यांसारख्या मूलभूत सुविधा अविरतपणे उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.
भटके-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली असून, येत्या 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन परिषदेतर्फे करण्यात आले आहे.बैठकीचे संचालन ओमप्रकाश गिरी तर आभार प्रदर्शन कुलकर्णी काका यांनी केले.