बीड
नवगण राजुरी येथे गणेश जन्म महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

नवगण राजुरी दि. २५( प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील श्री मंगलमूर्ती देवस्थान नवगण राजुरी येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेश जन्म महोत्सवानिमित्त दि.२६ ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
मा.खा. स्व. केशरबाई क्षीरसागर आणि सोनाजीराव क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून अखंड हरिनाम सप्ताहाचा आरंभ झाला असून याही वर्षी आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या महोत्सवातील दैनिक कार्यक्रमात पहाटे चार ते पाच काकडा आरती, सकाळी दहा ते बारा गाथा भजन, दुपारी तीन ते पाच गणेश पुराण, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकीर्तन नंतर भजन, भारुड होणार असून यात ह. भ. प. अर्जुन महाराज मोटे पळशी, जलाल महाराज सय्यद नाशिक, मत्सेंद्र महाराज निकम नेवासा, पांडुरंग महाराज उगले परभणी, नरेंद्र महाराज गुरव मालेगाव, साध्वी वैष्णवी दिदी सरस्वती आळंदी, गोविंद महाराज गोरे यांचे हरिकीर्तन होणार आहे. बुधवार दि. २७ रोजी श्री गणेशास गंगेच्या कावडीने जलाभिषेक घालण्यात येईल. रात्री ११ ते १२ या वेळेत आरती, उपासना व गणेश जन्माचे भजन होईल. सोमवार दि.०१ सप्टेंबर रोजी महाद्वारचा अनादिकाला होईल नंतर श्रीच्या पालखीची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सप्ताहाची सांगता मंगळवार दि.०२/०९/ २०२५रोजी सकाळी १०ते १२ या वेळेत श्रीक्षेत्र संस्थान नारायण गडाचे मठाधिपती ह. भ. प. प्रेममूर्ती महंत शिवाजी महाराज यांच्या काल्याचे कीर्तनाने होणार असून त्यानंतर महाप्रसाद होईल. तरी भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंगलमूर्ती देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर व समस्त ग्रामस्थ मंडळ नवगण राजुरी यांनी केले आहे.