स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने “हर घर तिरंगा” या उपक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विद्यालय बीड येथे ध्वजारोहण संपन्न

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने “हर घर तिरंगा” या उपक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विद्यालय बीड येथे ध्वजारोहण संपन्न
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने “हर घर तिरंगा” या उपक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विद्यालय बीड, प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालय बीड व किशोरी इंग्लिश स्कूल, बीड येथे दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत दररोज झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
आज दिनांक 13.08.2025 वार बुधवार रोजी राष्ट्रीय माध्यमिक विद्यालयात “हर घर तिरंगा” या उपक्रमाच्या अंतर्गत ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे चार्टर्ड अकाउंटंट मा. श्री. गिरीषजी गिलडा साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या श्रीमती तायडे डी. ओ. ह्या होत्या.
ध्वजारोहण कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर ठीक सकाळी 7:45 वाजता ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुणे चार्टर्ड अकाउंटंट श्री. गिरीशजी गिलडा साहेब यांचे स्वागत राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बीडच्या प्राचार्या श्रीमती तायडे डी. ओ. व प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पाटील ए.आय. यांनी केले. या कार्यक्रमास किशोरी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या मेघा बिर्ला व प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पाटील ए. आय. व शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



