बीड

चौसाळा येथील स्वराज्य गणेश मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर-२०२५

चौसाळा येथील स्वराज्य गणेश मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर-२०२५
चौसाळा शहरातील गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीचे विविध उपक्रम राबवणाऱ्या *स्वराज्य गणेश मंडळ चौसाळा* यांची कार्यकारिणी निवड नुकतीच एका विशेष बैठकीत पार पाडली
दिनांक ०१/०८/२०२५ रोजी झालेल्या या बैठकीत सर्व सामंजस्याने आणि एकमताने *अध्यक्षपदी- गोविंद कळासे, उपाध्यक्षपदी – गणेश नाईकवाडे, कार्याध्यक्षपदी- शैलेश शिंदे, सचिवपदी- निलेश नाईकवाडे, सहसचिवपदी- प्रविण (भैय्या) शिंदे, कोषाध्यक्षपदी- श्रीकांत राहिंज* यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
दरम्यान या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी समवेत- *संस्थापक अध्यक्ष- सुहास माळी,
 रवी मस्के, आण्णासाहेब नाईकवाडे, युवराज (भैय्या)औताडे,अक्षय(भैय्या) माळी, प्रविण पिसाळ,किरण कुचेकर,ऋषिकेश नाईकवाडे, प्रविण नाईकवाडे, सचिन मस्के,उत्रेश्वर नाईकवाडे, अनिकेत शिंदे, नवनाथ ताटे,* यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व यावेळी मंडळाच्या वतीने मन:पूर्वक सत्कार करण्यात आला.
मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही मंडळ विविध सामाजिक उपक्रम हाती घेणार असल्याचे सांगण्यात आले
त्यात *स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण* यांसारख्या उपक्रमांचा समावेश असणार आहे
नवीन कार्यकारिणीने गणेशोत्सव अधिक भव्य शिस्तबद्ध आणि लोकसहभागातून साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला असून
येत्या काळात *स्वराज्य गणेश मंडळ चौसाळा* शहरातील तरूणाईला सकारात्मक दिशा देणारे उपक्रम राबवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
Back to top button