राजेवाडी ते आंबवडे राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्यापही अपूर्णच संघर्ष समितीचा पंधरा अॅागस्टाला अमरण उपोषण अध्यक्ष अरविंद येलवे

राजेवाडी ते आंबवडे राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्यापही अपूर्णच
संघर्ष समितीचा पंधरा अॅागस्टाला अमरण उपोषण अध्यक्ष अरविंद येलवे
मंडणगड प्रतिनिधी
गेले ९ वर्ष मंडणगड तालुका संघर्ष समिती मार्फत राजेवाडी ते आंबवडे ह्या मंडणगड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण स्थितीत असल्याबाबत निवेदन आपणास वारंवार देण्यात आले. अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही .असे दिसून येत असल्याने आंदोलनांचा पाऊल उचलावा लागत आहे.
महोदय गेले ३ वर्ष राजेवाडी ते आंबवडे राष्ट्रीय महामार्गाचे काम खूप धीम्या गतीने सुरू आहे. सदर रस्त्याचे काम सुरू असताना मंडणगड तालुका, तसेच भिंगळोली, शेनाळे, चिंचाळी, पन्हळी, म्हाप्रळ, पाचरल इ. गावांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. खड्ड्यांमुळे स्थानिकांना प्रवास करणे देखील कठीण झाले आहे. पावसाळ्यात पाण्यामुळे खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे आणि खड्डे दिसत नसल्याने अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाला आहे. एस. टी. बस मधून प्रवास करताना अनेक वृद्ध लोक असतात. त्यांना सुद्धा खड्ड्यांमुळे प्रवास करताना खूप त्रास होतो. तसेच अपघातग्रस्त ठिकाणी सूचना फलक सुद्धा लावण्यात आलेले नाहीत. परंतु सामान्य माणसाला होणारा त्रास हा प्रशासन आणि कंत्राटदार यांच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही असे दिसून येते. गेले वर्षभर मंडणगड तालुका संघर्ष समिती मार्फत आम्ही पाठपुरावा करत असताना सुद्धा गतवर्षीच्या परिस्थितीत काही सुधारणा झाली असल्याचे जाणवते.
तरी आमची आपणास विनंती आहे की, सदर महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर आपणामार्फत योग्य ती कार्यवाही करून सदर कंत्राटदाराचे नाव काळसूचीत नोंदवावे.दि.10/08/2025 पर्यत रस्त्यावरील खड्डे डांबरांने भरुन देण्याचे काम कंत्राटदारा मार्फत करावे.आणि गरजेच्या ठिकाणी सुचना फलक लावण्यात यावे.सदरील कामे दिलेल्या वेळेत न झाल्यास 15/08/2025 स्वातंत्रदिनांच्या दिवशी संघर्ष समिती मंडणगड मार्फत अमर उपोषण तहशील कार्यालया समोर करण्यात येणार आहे.त्यानंतर होणार्या परिणामांना संबधीत अधिकारी जबाबदार राहतील.निवेदन देताना अध्यक्ष अरविंद येलवे , कार्याध्यक्ष भरत सरपरे ,सल्लागार अभय पिचूर्ले,विश्वास सुखदरे ,सदस्य अतुल पवार,महेद्र येलवे,रमेश चिखलकर,सिंकदर बुरूड आदी पदाधिकारी उपस्थित होते.



