बीड

स्व.एम.ई भोरे जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाने दिला पर्यावरणसंवर्धनाचा जागरूक संदेश

स्व.एम.ई भोरे जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाने दिला पर्यावरणसंवर्धनाचा जागरूक संदेश

जामखेड प्रतिनिधी:-२३ जुलै २०२५ रोजी वनसंवर्धन दिन निमित्त सनराईज मेडिकल & एज्युकेशन फौंडेशन चे ,स्व.एम.ई भोरे जुनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “वृक्ष लावा पर्यावरण वाचवा” या मूलमंत्राने प्रेरित होऊन विद्यार्थी, एकत्र येत संकुलातील परिसरात विविध प्रकारची फळझाडे, औषधी वनस्पती छायादायी झाडांची लागवड,संगोपन केली.या उपक्रमात पर्यावरण जागृतीचा ठसा उमटवत विद्यार्थ्यांनी “एक झाड एक शपथ” घेतली.पावसाच्या सरींमध्ये बहरलेली ही हिरवाई विद्यार्थ्यांच्या हातून वटवृक्ष, करंजी, आंबा, नारळ, अशोकाचे, वृक्षांच्या माध्यमातून मूर्त स्वरूपात साकारली. सनराईज् शैक्षणिक संकुलाचे संचालक प्रा.तेजस दादा भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगितले ते म्हणाले, “झाडे हे पृथ्वीचे फुप्फुस आहेत, त्यांचे रक्षण संवर्धन आपली सामूहिक जबाबदारी आहे.”यावेळी प्रा:विनोद बहिर, प्रा:प्रदीप भोंडवे, प्रा: स्वाती पवार, प्रा:दादासाहेब मोहिते,प्रा: छबिलाल गावित, प्रा: विवेक सातपुते, प्रा सुनील घाडगे व उपस्थित होते. उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक नैतिक जाणीव निर्माण होत असून, वनसंवर्धन फक्त एक दिवसाचा कार्यक्रम नसून आयुष्यभर निभावायची जबाबदारी आहे, पर्यावरण रक्षणासाठीची ही एक सकारात्मक पावले भविष्यासाठी नवी दिशा ठरणार आहेत,

Back to top button