बीड

मध्यस्थी राष्ट्रासाठी‘‘ अभियान यशस्वी करा – प्रमुख जिल्हा न्यायाधीश आनंद यावलकर

मध्यस्थी राष्ट्रासाठी‘‘ अभियान यशस्वी करा – प्रमुख जिल्हा न्यायाधीश आनंद यावलकर
बीड – मा.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांनी दिनांक 1 जुलै 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या 90 दिवसांच्या कालावधीमध्ये मध्यस्थी राष्ट्रासाठी हे अभियान संपूर्ण देशामध्ये राबविण्याचे आवाहन केले आहे.
त्या नुसार सदर अभियान मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.आनंद यावलकर यांच्या मार्गदर्शनासाठी बीड जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये राबविण्यात येत आहे. सदर अभियाना अंतर्गत बीड जिल्हयातील सर्व पक्षकारांनी आपापली दिवाणी प्रकरणे, तडजोडजन्य फौजदारी प्रकरणे, 138 एन.आय.अॅक्टची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, वसुलीची प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, मोटार अपघाताची प्रकरणे व इतर तडजोडजन्य प्रलंबीत प्रकरणे मध्यस्थीव्दारे तडजोडीने यशस्वी करून सदर अभियान यशस्वी करण्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा. या करिता आपले प्रकरण ज्या न्यायालयामध्ये प्रलंबीत आहे त्या न्यायालयामध्ये आपल्या विधिज्ञांमार्फत सदर प्रकरण मध्यस्थीव्दारे मिटविण्याकरिता अर्ज दाखल करावा व आपले प्रकरणे मध्यस्थीव्दारे तडजोडीने मिटवावे व मा.सर्वोच्च न्यायालयाचे मध्यस्थी राष्ट्रासाठी हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती रेणूका सातव यांनी केले आहे.
Back to top button