बीड

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ; साकत येथील इंदिरा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ; साकत येथील इंदिरा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

डॉ. सुहास सूर्यवंशी यांचे आवाहन ; आर्थिक सक्षमीकरणासाठी डिप्लोमा शिक्षण घ्या

जामखेड प्रतिनिधी –जामखेड तालुक्यातील साकत येथील चेतना सेवा संस्थेच्या इंदिरा पॉलिटेक्निक कॉलेजने आपल्या २० वर्षांच्या कार्यप्रवासानिमित्त यंदाच्या शैक्षणिक वर्षात सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश योजना जाहीर केली आहे. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

या उपक्रमाबाबत माहिती देताना संस्थेचे सचिव डॉ. सुहास सूर्यवंशी म्हणाले की, शिक्षण शुल्क परवडत नसल्यामुळे अनेक होतकरू विद्यार्थी तांत्रिक शिक्षणापासून दूर राहतात. त्यांना संधी मिळावी, हा या योजनेचा उद्देश आहे. तसेच, पॉलिटेक्निक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना अल्पावधीतच रोजगाराच्या संधी प्राप्त होतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

कॉलेज कोड 05668 असलेल्या इंदिरा पॉलिटेक्निकमध्ये यंदा खालील शाखांसाठी प्रवेश खुले आहेत –
कॉम्प्युटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, आयटी आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. प्रत्येक कोर्ससाठी ६० जागा उपलब्ध असून, कोर्स तीन वर्षांचा आहे. प्रवेशासाठी अंतिम तारीख ४ जुलै २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

*चौकट*

कॉलेज प्रशासनाने प्रवेश प्रक्रियेत कोणतेही डोनेशन स्विकारले जाणार नसल्याचे जाहीर करत स्पष्ट सांगितले आहे. यासोबतच शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण लाभ मिळवून देण्याची हमीही प्रशासनाने दिली आहे.

या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळणार असून, परिसरातील विद्यार्थी व पालक वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. शिक्षणात पारदर्शकता व समानतेचा मार्ग मोकळा करणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Back to top button