ग्रामीण विकास केंद्राचे काम उल्लेखनीय – गोरक्ष लोखंडे (मागासवर्गीय आयोगाचे सदस्य)

ग्रामीण विकास केंद्राचे काम उल्लेखनीय – गोरक्ष लोखंडे (मागासवर्गीय आयोगाचे सदस्य)
जामखेड प्रतिनिधी – दि.१७ आमचा श्वासच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. जो इतिहास विसरतो, तो इतिहास घडवू शकत नाही.डाॅ.बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहूनच काम केले पाहिजे.आयोगाला स्वतः ची प्रणाली आहे.एखाद्या पदावर बसण्यापेक्षा स्वतः ला झोकून काम केले पाहिजे.सत्तेशिवाय प्रश्न सोडवता येत नाहीत.स्थानिक स्वराज्य संस्था अशा विविध माध्यमातून सत्ता काबीज केली पाहिजे.समाजातील बेघरांना घर देता आले पाहिजे.तरुणांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही.व्यसनापासून दूर रहावे.स्रियांच सन्मान केला पाहिजे.अन्याय करु नका.डाॅ.आंबेडकरांच्या पाठीशी राहणाऱ्या रमाबाई आंबेडकरांचा मोठा त्याग आहे.
जामखेड शहरातील ग्रामीण विकास केंद्र येथे दिनांक १७ जून २०२५ रोजी जामखेड दौऱ्यात ॲड.गोरक्ष लोखंडे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती ,आयोग ,वरळी, मुंबई (सदस्य – सचिव दर्जा) हे आले होते.याप्रसंगी ग्रामीण विकास केंद्राच्या वतीने त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करून शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी ग्रामीण विकास केंद्राचे ॲड.डॉ.अरुण जाधव, संचालक बापूसाहेब ओव्हळ,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिश पारवे, तेजस भगवान (सहायक आयुक्त, समाज कल्याण), शासकीय मुलांची वस्तीगृहाचे अधिक्षक अनिल गर्जे, वरिष्ठ लिपिक मधुकर महानूर, भटके विमुक्त नेते रामकृष्ण माने,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नाथाभाऊ अल्हाट, समाजसेवक संदीप आखाडे,निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजिनाथ केसकर, समन्वयक संतोष चव्हाण,आदिवासी नेते विशाल पवार, मच्छिंद्र जाधव,राजू शिंदे, ऋषिकेश गायकवाड, अरविंद जाधव, संतोष पवार ,जाकीर तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना गोरक्ष लोखंडे म्हणाले की, ॲड. डॉ.अरुण जाधव यांनी भटके विमुक्त आदिवासी, गोरगरीब, कष्टकरी अन्याय अत्याचारा संबंधित त्यांचे कार्य ऐकून होतो व आज भेटून आनंद झाला. ग्रामिण विकास केंद्र ,जामखेड निवारा बालगृहाचे कामकाज उल्लेखनीय आहे.
यावेळी बोलताना ॲड.डाॅ.अरुण जाधव म्हणाले की, समाज कल्याण विभागाकडून इतर बहुजन कल्याण विभाग वेगळा केला आहे तसेच १९९६ नंतर महाराष्ट्र भटके विमुक्त आयोग झाला नाही, आमच्यासाठी एक स्वातंत्र्य आयोगासाठी प्रयत्न व्हावेत. असे मत मांडले.



