बीड

खर्ड्यात पारधी समाजाला मिळणार हक्काचे घर आणि जागा — अॅड. डॉ. अरुण जाधव यांची ग्वाही

खर्ड्यात पारधी समाजाला मिळणार हक्काचे घर आणि जागा — अॅड. डॉ. अरुण जाधव यांची ग्वाही

जामखेड प्रतिनिधी:तालुक्यातील खर्डा येथे कान्होबा वसतीजवळ पारधी समाजाच्या घरकुलासाठी दि. १३ जून २०२५ रोजी विशेष बैठक संपन्न झाली.

या बैठकीचे अध्यक्षस्थान खर्डा गावच्या सरपंच सौ. संजीवनीताई पाटील यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अॅड. डॉ. अरुण जाधव उपस्थित होते.

बैठकीत सरपंच संजीवनीताई पाटील म्हणाल्या, पारधी समाजाला हक्काची जागा, पिण्याचे पाणी, वीज आणि घरकुल मिळावे यासाठी ग्रामपंचायत ठराव करून एक गुंठा जागा देण्याची कार्यवाही लवकरच केली जाईल. या समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

या आश्वासनाचे अॅड. डॉ. अरुण जाधव यांनी स्वागत करताना सांगितले की, “पारधी समाजासाठी ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत घरकुल मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. यापूर्वी मदारी समाजासाठी यशवंतराव मुक्त वसाहत योजनेतून घरकुल उभारण्यात आले, तसेच पारधी समाजासाठीदेखील वसाहत लवकरात लवकर उभारण्यासाठी ग्रामपंचायतसोबत हातात हात घालून काम करू.

या बैठकीस चेअरमन वैजनाथ पाटील, विशाल पवार, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आतिश पारवे, राजू शिंदे, नीता इंगळे, उर्मिला कवडे, राणी खटावकर, लहू पवार, ललिता काळे, चंद्रकला पवार, लक्ष्मी काळे, सचिन शिंदे, फकीर मदारी, हुसेन मदारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button