बीड

तिसगाव पैठण रोड आतापर्यंत होते धुळीचे साम्राज्य,तर आता बनले चिखलाचे साम्राज्य

तिसगाव पैठण रोड आतापर्यंत होते धुळीचे साम्राज्य,तर आता बनले चिखलाचे साम्राज्य

अहिल्यानगर  प्रतिनिधी:-पाथर्डी तालुक्यातील सध्या तिसगाव ते पैठण रोडचे काम चालु आहे, गेली आठ महिन्यांपासून हे काम चालू आहे आत्तापर्यंत फक्त एक किलो मीटरचे काम झाले आहे, बाकी सर्व चांगला रस्ता उखडून सर्व रोडवर मातीकाम आहे, यामुळे रोडवरुन मोठ्या गाड्या मुळे सर्व धुळीचे साम्राज्य पसरले होते, आता पावसामुळे तर पुर्ण रस्ता चिखलमय झाला आहे, यामुळे गाड्या चालवायला दम छाक होते, आतापर्यंत खुप मोटरसायकल वाले खुप जन गाडीवरून पडुन फ्रॅक्चर झाले,तर काहींना मुका मार लागला आहे, तेव्हा या रोडचे काम लवकर पूर्ण करावे नाही तर काहीतरी पर्याय काढला पाहिजे असे सर्व ग्रामस्थांचे म्हणणे आहे, असं नाही झालं तर खुप मोठ्या प्रमाणावर ॲक्शिडेंन्ट झाल्या शिवाय रहानार नाही,असे जर घडलं तर याला जबाबदार कोण असा सुर ग्रामस्थांकडून निघत आहे, जे कोन कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी या गोष्टीचा विचार करून काय तो निर्णय घ्यावा,

Back to top button