रायगड

पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तिव्र आंदोलन

 

दहशदवादी पुतळ्याचे दहन करून प्रशासनाला देण्यात आले निषेधार्थ निवेदन

रायगड उपसंपादक: संतोष उध्दरकर.

म्हसळा: काश्मिर मधील पहेलगाव येथे अतिरेक्यांनी केलेल्या हिंदु पर्यटकांवर भ्याड हल्यात २८ निष्पाप हिंदु पर्यटकांना जिव गमवावा लागला. हा हल्ला तुमचा धर्म कोणता विचारून केला गेला, या भ्याड हल्याच्या निषेधार्थ म्हसळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने म्हसळा दिघी नाक्यावर पाकिस्तानी दहशदवादी रुपी पुतळ्याचे दहन करून पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या.व पोलिस प्रशानाला निषेधार्थ निवेदन देऊन या दहशदवाद्याना वेळीच ठेचुन काढा व पाकिस्तानशी कायमचा संबंध तोडुन टाका अशी मागणी करण्यात आली.
यावेळी म्हसळा तालुका प्रमुख सुरेश कुडेकर, युवा तालुका अधिकारी कोस्तुभ करडे, शहर प्रमुख विशाल सायकर, उप शहर प्रमुख दिपल शिर्के, तालुका संघटकबाळा म्हात्रे, उप तालुका प्रमुख,राजाराम तिलटकर, हेमंत नाक्ती, दामोदर कांबळे, निशा पाटील, नौमान वसगरे, भालचंद्र नाक्ती, अजय पेरवी, पवन मर्चंड आदि शिवसैनिक उपस्थित होते.
या हल्याच्या निषेधार्थ दहशवादी नागड्या पुतळ्याला जाळून त्या अतिरेक्यांचा अशाच प्रकारे नायनाट केला पाहिजे. तसेच प्रत्येक भारतीय या दहशदवाद्यांशी लढण्यासाठी सज्ज आहे.
कौस्तुभ करडे.
म्हसळा युवा तालुका अधिकारी.

Back to top button