बीड

दलितांवरील हल्ले कधी थांबणार?, समाजात सामाजिक सलोख्याची गरज – प्रा. विकी घायतडक यांची प्रतिक्रिया

दलितांवरील हल्ले कधी थांबणार?, समाजात सामाजिक सलोख्याची गरज – प्रा. विकी घायतडक यांची प्रतिक्रिया

जामखेड प्रतिनिधी:
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांवर आधारित संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. या घटनेमुळे प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळाला आहे. मात्र, काही जातीवादी प्रवृत्ती समाजात तेढ निर्माण करून दहशत पसरवत आहेत.

सध्या सोशल मीडियावर अशा घटनांचे व्हिडिओ, फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून समाजकंटकांनी विविध कारणांवरून जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रकार वाढले आहेत.

खडकत, ता. आष्टी, जिल्हा बीड येथे अशाच एका घटनेत दलित समाजावर हल्ला करण्यात आला असून यात अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना निंदनीय असून प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्राचार्य विकी घायतडक यांनी केली आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, “भारत हा विविधतेतून एकता साधणारा देश आहे. सर्व धर्म व जातींच्या लोकांनी एकत्र राहून ‘भारतीय’ ही ओळख जपायला हवी. समाजमाध्यमांनी अफवांवर विश्वास न ठेवता सत्य समोर आणणं गरजेचं आहे.”

Back to top button