बीड

वडवणी रेल्वे स्टेशनला संत सेवालाल महाराज यांचे नाव द्या,  बंजारा पॅंथर रेल्वेमंत्री यांना निवेदन सादर करणार – रोहिदास पवार 

वडवणी रेल्वे स्टेशनला संत सेवालाल महाराज यांचे नाव द्या,
 बंजारा पॅंथर रेल्वेमंत्री यांना निवेदन सादर करणार – रोहिदास पवार
बीड (प्रतिनिधिती):- बंजारा,बहुजन समाजाचे आराध्य दैवत क्रांतिकारी सेवालाल महाराज हे मुळात व्यापारी असून इंग्रज काळात बंजारा समाजाच्या या व्यवसायावर निर्बंध लावून लदनीचा व्यापार बंद करून इंग्रजांनी बंजारा समाजाचे पिळवणूक करण्याचा प्रयत्न केला, परंतु पराक्रमी योद्धा असणाऱ्या बंजारा समाजाने इंग्रजांशी युद्ध केला,तेव्हा क्रांतिकारी सेवालाल महाराज नावाचा पराक्रमी महापुरुष आपल्या समाजाच्या संरक्षणसाठी व अन्याय अत्याचार वर आवाज उठून संपूर्ण देशात लदनीच्या व्यापाराने पालचा घातला,आज जी भारतभर रेल्वे लाईन आपण बघत आहे,ती रेल्वे लाईन त्याच मार्गाने तंतोतंत सेवालाल महाराजांनी मार्गक्रमण केलेला आहे.तोच रेल्वे रस्ता अहिल्यानगर ते परळी लोहमार्ग उदयास आलेले आहे.बीड जिल्ह्यातील वडवणी रेल्वे स्टेशनला क्रांतिकारी सेवालाल महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी बीड जिल्ह्यातील बंजारा समाज मागील दहा वर्षापासून सातत्याने राज्य सरकार व केंद्र सरकार कडे करत आहे, 3 जुलै 2019 रोजी बंजारा पॅंथरचा शिष्टमंडळ तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना निवेदन सादर केला होता, त्यावेळी पियुष गोयल यांनी शब्द दिला होता की वडवणी रेल्वे स्टेशनला सेवालाल महाराज यांचे नाव देण्यात येईल अशी माहिती बंजारा पॅंथर चे अध्यक्ष इंजि.रोहिदास पवार यांनी दिली, बंजारा पॅंथरचा शिष्टमंडळ केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून निवेदन सादर करणार आहे अशी माहिती बंजारा पॅंथर चे अध्यक्ष रोहिदास पवार यांनी पत्रकारांना दिली.
Back to top button