गुजर समाज देवसेनेचे जिल्हाध्यक्ष रतन गुजर यांचा सपत्नीक सत्कार
बीड (प्रतिनिधी)- अखिल भारतीय देवनारायणच्या सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने जिल्हाध्यक्ष रतन गुजर यांचा सपत्नीक सत्कार मौजे भाळवणी येथे ग्रामस्थांकडून करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना रतन गुजर म्हणाले की, गुजर समाज एक संघ व्हावा, संघटित व्हावा, गुजर समाजाचे प्रश्न प्रशासनाकडे मांडण्यासाठी मी नेहमी तत्पर राहील. समाज बांधवांचा एकमेकांशी संपर्क कमी असल्याने आपण एकटे समजू लागलो लवकरच एकसंघ सर्वांचा मेळावा आयोजित करण्याचा विचार आहे.
या सत्कार समारंभाला रामदेवराव मामा दहे, माजी सरपंच दादाराव बहिरवाळ, नाना मस्के, मांडवगळीचे चेअरमन माजी सरपंच मुके पाटील, लहू दहे, बंडाने दाजी, अंकुश दहे, बाळू दहे, गोविंद खिलारे व पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव उपस्थित होते.