बीड

मराठवाडा जनता विकास परिषदेची बीड जिल्हा कार्यकारिणी जाहीर

मराठवाडा जनता विकास परिषदेची बीड जिल्हा कार्यकारिणी जाहीर
माजलगाव : मराठवाडा जनता विकास परिषदेची बीड जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून बीड जिल्हा अध्यक्ष पदी राजेंद्र आगवन तर सचिव पदी सुमंत गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे
राजेंद्र आगवन यांच्या निवास स्थानी दिनांक 05 एप्रिल 2025 रोजी बीड येथे बैठक घेण्यात आली मराठवाडा जनता विकास परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक माजी शिक्षक आमदार डी.के.देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत सर्वानुमते खालील प्रमाणे बीड जिल्हा शाखेची कार्यकारिणी निवडण्यात आली
प्रमुख मार्गदर्शक तथा केंद्रीय सदस्य पदी माजी शिक्षक आमदार डी.के. देशमुख ,प्रा.डॉ.डी.एच.थोरात
अध्यक्ष राजेंद्र आगवन उपाध्यक्ष शिरीष देशमुख सचिव सुमंत गायकवाड कोषाध्यक्ष अतुल कुलकर्णी सदस्य प्रा. डॉ.हरिदास विधाते,गणपत सौंदळे, सौ.मयुरी राजहंस, गिन्यानदेव गदळे, विशाल जाजू तर
अभ्यास गट प्रमुख संतोष मुळी सदस्य अनिल महाजन,सौ.मनिषा शितोळे,प्रदीप जोशी
बैठकीचे संचालन सचिव सुमंत गायकवाड यांनी केले प्रमुख मार्गदर्शक माजी शिक्षक आमदार डी.के.देशमुख यांच्या मार्गदर्शना नंतर अतुल कुलकर्णी यांच्या आभाराने बैठकीची सांगता झाली
Back to top button