यशासाठी संघर्ष महत्त्वाचा – डॉ. संजय भोरे

यशासाठी संघर्ष महत्त्वाचा – डॉ. संजय भोरे
सनराईज फाऊंडेशनच्या २००४-०५ बॅचचा गेट-टुगेदर उत्साहात संपन्न
जामखेड, दि. २३ मार्च – “जीवनात यश संपादन करण्यासाठी संघर्ष करावा लागतो,”
यशासाठी संघर्ष महत्त्वाचा आहे.असे प्रतिपादन सनराईज मेडिकल & एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांनी केले. ते पाडळी येथील साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या २००४-०५ च्या बॅचच्या गेट-टुगेदर कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शरद वराट सर आणि विद्यार्थिनी राणी पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय भोरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून हनुमान विद्यालय दिघोळचे सहशिक्षक प्रा. जाकीर शेख उपस्थित होते. तसेच, स्व. एम.ई. भोरे जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या अस्मिता जोगदंड/भोरे मॅडम व संचालक प्रा. तेजस भोरे यांनी उपस्थिती दर्शवली.
विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षक व मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी किरण पवार, विनोद पवार, संतोष पवार, अनिल ठाकरे ,बुवासाहेब दहिकर,किरण सांगळे, विजय वाघ,पिंटु वटाणे, आबासाहेब सकटे,सागर पवार, रतन ठाकरे,राणी पवार या बॅच च्या विद्यार्थ्यांनी
शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत शाळेसाठी जनरेटर भेट दिले. तसेच रोहिणी पवार,वर्षा पवार,अश्विनी डुचे,योगेश पवार, सलीम सय्यद, अरविंद पवार, लक्ष्मण खैरे,दयानंद शिंदे, अशोक पवार, तुळशीराम वटाणे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील घाडगे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रदीप भोंडवे सर यांनी मानले.
दुपारच्या सत्रात सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते, त्यामुळे वातावरण जुन्या आठवणींनी भारावून गेले होते.



