बीड

खर्डा चौक ते बीड रोड रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे – राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

खर्डा चौक ते बीड रोड रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे – राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

जामखेडकरांची गैरसोय थांबवा, रस्त्याचे काम त्वरित सुरू करा – राजेंद्र कोठारी

जामखेड: शहरातील खर्डा चौक ते बीड रोड (दूध डेअरी, बीड रोड) या मार्गाचे काम तातडीने हाती घेऊन पूर्ण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी केली आहे.
आज दिनांक २५ मार्च २०२५ रोजी
जामखेड पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक महेश पाटील तसेच राष्ट्रीय महामार्गाचे नरेंद्र गांगोले (प्रोजेक्ट डायरेक्टर),सचिन पवार (प्रोजेक्ट मॅनेजर),शिलादित्य मंडल (कन्सलटंट) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी यांची सविस्तर चर्चा झाली.
या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने खराब रस्त्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांचा धोका आहे, तसेच शहराच्या विकासालाही अडथळा निर्माण होत आहे.
राजेंद्र कोठारी यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की, ज्या काही अडचणी असतील त्या नंतर सोडवाव्यात, मात्र रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. शहरातील नागरिकांना चांगल्या रस्त्यांची सुविधा मिळावी यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जामखेड सरचिटणीस प्रकाश काळे, उमरभाई कुरेशी, संपत राळेभात, मंगेश आजबे,तालुका युवक अध्यक्ष काकासाहेब राळेभात,शहर अध्यक्ष वसिम सय्यद आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button