ॲड.डॉ. अरुण जाधव यांच्या लढ्याला यश

ॲड.डॉ. अरुण जाधव यांच्या लढ्याला यश
वंचित बहुजन आघाडीचा निर्णायक विजय – जामखेड आगाराला दोन नवीन बसेस
जामखेड: जामखेड आगारातील जुन्या बसेस मोडकळीस आल्या असून, प्रवाशांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी शासनाकडे नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला अखेर यश मिळाले असून, जामखेड आगारासाठी दोन नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नवीन बसेस मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार असून, अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवास शक्य होणार आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवासी वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
डॉ. अरुण जाधव यांच्या या प्रयत्नांमुळे जामखेडसाठी नव्या सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भविष्यात आणखी सुधारणा व्हाव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
*ॲड.डॉ. अरुण जाधव यांचे मत*
“जामखेडसारख्या भागात सार्वजनिक वाहतुकीची मोठी गरज आहे. प्रवाशांचे हाल पाहून, आम्ही दिनांक २० मार्च रोजी जामखेड आगारासमोर आंदोलन केले आणि शासनाकडे आग्रही मागणी लावून धरली. विधान परिषदेचे सभापती माननीय प्रा राम शिंदे साहेब यांनी आंदोलना ची दखल घेऊन तातडीने दोन नवीन एटी बस उपलब्ध करून दिल्या याचा आनंद आहे. याबद्दल सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांचे अभिनंदन, अजून १५ एस टी बस गाड्या पहिजेत.भविष्यात आणखी सुधारणा व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू.
*आंदोलनाची पार्श्वभूमी*
गेल्या काही महिन्यांपासून जामखेड आगारातील बसेसच्या दुरवस्थेचा मुद्दा नागरिक आणि प्रवासी यांच्यात चर्चेचा विषय बनला होता. अनेक बसेस वारंवार बंद पडत असल्याने वेळेवर वाहतूक सेवा मिळत नव्हती. ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी प्रवाशांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्वरित नवीन बसेस देण्याची मागणी केली.



