अठरापगड जातींना सोबत घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार- राजेंद्र मस्के

अठरापगड जातींना सोबत घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार- राजेंद्र मस्के
बीड प्रतिनिधी- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाची बैठक राष्ट्रवादी भवन बीड येथे पार पडली, यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रांत अध्यक्ष श्री पंडित कांबळे सर यांच्या उपस्थितीत बैठक बोलण्यात आली होती. यावेळी मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यातून प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के असे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारधारेवर चालतो त्यांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे, मराठवाड्याच्या विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी पुढाकार घेणारा नेता म्हणून पवार साहेबांची ओळख आहे,नामांतरांच्या वेळेला राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचे काम पवार साहेबांनी केले आहे, पवार साहेब नेहमीच पुरोगामी विचार जोपासणारा नेता आहे अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण सर्व सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतो, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये देखील वंचित समाजाला प्रतिनिधित्व देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष करणार असल्यास मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले,
यावेळी प्रांताध्यक्ष श्री पंडित कांबळे सर यांनी असे सांगितले की माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला पवार साहेबांनी सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी दिली आहे, ती योग्यरित्या मी पार पाडत आहे श्री कांबळे यांनी बाळासाहेब शिनगारे यांना जिल्हा कार्याध्यक्षाची जबाबदारी दिली होती, त्यांचे काम पाहून बाळासाहेब शिनगारे यांची सामाजिक न्याय विभागाच्या बीड जिल्हाअध्यक्ष पदाचे नव्याने घोषणा केली आहे. बाळासाहेब शिनगारे हे बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वाढवण्यासाठी दिनदलित वंचित घटकांना एकत्र करून पवार साहेबांचे हात बळकट करणार आहेत, अशा भावना श्री कांबळे यांनी व्यक्त केल्या.



