बीड

लिंबागणेश येथे छावा चित्रपट प्रदर्शित ; अनुष्का रणखांबच्या वाढदिवसानिमित्त आयोजन 

लिंबागणेश येथे छावा चित्रपट प्रदर्शित ; अनुष्का रणखांबच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
—-
लिंबागणेश:- ( दि.१६ ) छत्रपती संभाजी महाराजांचा ईतिहास नविन पिढी पर्यंत पोहोचवला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे काल दि.१५ मार्च रोजी रात्री   कु.अनुष्का शिवाजी रणखांब हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने छावा चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते. गावच्या प्रमुख चौकात मारोती मंदिरासमोर सोय करण्यात आली होती.चित्रपट सुरू करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करुन अनुष्का हिचा वाढदिवस साजरा केला.यावेळी अनुष्काच्या कुटुंबियांनी तिचे औक्षण केले यावेळी डॉ.गणेश ढवळे, पत्रकार हरीओम क्षीरसागर, लेनाजी गायकवाड  व ग्रामस्थ शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईतिहास, भावना, उत्कटता, देशभक्ती,साहस दृष्ये यांचा सुरेख संगम साधला गेलेल्या अप्रतिम कलाकृती असलेल्या छावा चित्रपटात पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराजांची ज्या क्रुर पद्धतीने औरंगजेबाने हत्या केली तो दुर्दैवी प्रसंग पाहताना अक्षरक्ष: काळजावर दगड ठेवून छत्रपती संभाजी महाराजांना दिलेली वेदना पाहुन हृद्य पिळवटून जाते. भावना अनावर होतात. या प्रसंगी महिला भगिनी, तरूण वर्ग छत्रपती संभाजी राजांची वेदना पाहुन अगदी ढसाढसा रडत होते. चित्रपटाच्या शेवटी  शिवगर्जना आणि घोषणाबाजी करण्यात आली. मुलीच्या वाढदिवसा निमित्ताने छावा चित्रपटाचे आयोजन करताना ग्रामीण भागातील लोकांना गावातच चित्रपट पहाता यावा यासाठी अनावश्यक खर्च टाळुन  गावात चित्रपटाचे आयोजन करण्यात आल्याचे अनुष्काचे वडील शिवाजी रणखांब यांनी सांगितले.
Back to top button