बीड
सारथी’च्या ड्रोन पायलट प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी पुढील पाच वर्षांत राज्यात दोन लाख ड्रोनचा वापर; नोकरीला पर्याय

सारथी’च्या ड्रोन पायलट प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी
पुढील पाच वर्षांत राज्यात दोन लाख ड्रोनचा वापर; नोकरीला पर्याय
राज्यात पुढील पाच वर्षात कृषी व अन्य क्षेत्रात किमान दोन लाख ड्रोन येणार आहेत, ते चालवण्यारराठी मोठ्या प्रमाणात पायलटची गरज भासणार आहे. ही गरज ओळखूनच ‘सारथी’ ने राज्यातील मराठा समाजातील युवक युवतींसाठी सेनापती धनाजी जाधव सारथी शेतकरी ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे.
गेल्या वर्षभरात या कार्यक्रमांतर्गत २६० ड्रोन पायलट तयार झाले असून, अनेकांनी आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली आहे. अजूनही ७०० उमेदवार प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत. या उपक्रमाला महिलांचा प्रतिसादही चांगला मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुजरांअभावी राज्यातील शेती संकटात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. पिकांच्या वाढीसाठी खते आणि कीटकनाशकांचा सतत वापर करावा लागतो, मात्र त्याच्या फवारणीसाठी मजुरांची टंचाई जाणवते. या मजुरांच्या टंचाईला ड्रोन हा पर्याय म्हणून उभा राहत आहे. मजुरांची टंचाई, मजुरीचा दर, सर्वच क्षेत्रावर समप्रमाणात लागवड होईलच याची शाश्वती नसणे अशा अडचणीवर मात करण्यासाठी आणि वेळेची बचत होत असल्याने शेतीत ड्रोनचा वापर वाढत आहे. शेतीसह उद्योग, संरक्षण, जमीन मोजणी आदी विभागातही याचा वापर होत आहे. ड्रोन चालवण्यासाठी प्रशिक्षित पायलटची गरज असते. हे लक्षात घेऊन सारथी संस्थेच्या सेनापती धनाजी जाधव सारथी शेतकरी ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
दोन गटांत प्रशिक्षण मराठा व कुणबी समाजातील ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे, अशा युवक युवतींना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डिबीसीए) मान्यता दिलेल्या केंद्रावर प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण हे सात दिवस व १८० दिवस असे दोन गटांत दिले जात जाते. या प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च सारथी संस्थेकडून करण्यात येत आहे. परभणी, राहुरी व दापोली कृषी विद्यापीठातील प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही योजना जिल्हा स्तरावर राबविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडील उमेद शाखेवर सोपवण्यात आली आहे.

खरेदी आवाक्याबाहेर
• प्रशिक्षण घेतलेले अनेक पायलट स्वतःचा व्यवसाय करू लागले आहेत, ही या प्रशिक्षणाची जमेची बाजू आहे. ड्रोन पायलटसाठी व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. असे असले तरी, ड्रोन खरेदी मात्र अजूनही प्रशिक्षण घेतलेल्या तरुण-तरुणीच्या आवाक्याबाहेर आहे. नोकरीला पर्याय ठरत असलेल्या या व्यवसायात मोठ्या प्रमाणात तरुण येत असून, ड्रोन खरेदी अधिक किफायतशीर होईल, यासाठी मात्र सरकारलाच पावले उचलण्याची गरज आहे.

“सध्या शेतीत मजुरांची मोठी समस्या आहे. सारथी संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतल्यानंतर जून २०२४ पासून शेतीसाठी मी ड्रोनचा वापर करत आहे. एक एकर शेतीवर मजुरांच्या माध्यमातून फवारणी करण्यास किमान एक दिवस लागतो. हेच काम ड्रोनच्या माध्यमातून मात्र सहा मिनिटात होते. या व्यवसायातून महिन्याला ६० ते ८० हजार उत्पन्न मिळते. बीडच्या सौ.के.एस.के.(काकू) कृषी महाविद्यालयाची विदयार्थीनी नूतन टेमगिरे सध्या या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे.