बीड

पवित्र रमजानच्या अनुषंगाने मुस्लिम बहुल भागात सोयी-सुविधा सुरळीत करा 

पवित्र रमजानच्या अनुषंगाने मुस्लिम बहुल भागात सोयी-सुविधा सुरळीत करा
आ.संदीप क्षीरसागरांकडून नगरपरिषदेला सूचना
बीड दि.२२ (प्रतिनिधी):- पुढील महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. या अनुषंगाने बीड शहरातील सर्वच प्रभागातील मुस्लिम बहुल भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत जोडणी, स्वच्छतेची कामे लवकरात लवकर करून घ्या. अशा सूचना आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड नगरपरिषद प्रशासनाला दिल्या आहेत.
              यावर्षी पवित्र असलेला रमजान महिना मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच येणार आहे. पवित्र रमजान महिन्याच्या आगमनानंतर मुस्लिम बांधव पूर्ण महिनाभर कडक उपवास आणि अल्लाह ची उपासना करतात. त्यामुळे विविध सोयी सुविधा सुरळीतपणे उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यामुळे शहरातील सर्वच प्रभागातील मुस्लिम बहुल भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत करणे, विद्युत जोडणी पूर्ण करणे तसेच परिपूर्ण स्वरूपात स्वच्छतेची कामे करणे इत्यादी कामे प्राधान्याने, पवित्र रमजान महिना सुरू होण्यापूर्वीच करून घ्यावेत अशा सूचना आ.संदीप क्षीरसागर यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिल्या आहेत.
Back to top button