संपादकीयसोलापूर

प्राची प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..

प्राची प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

मंद्रुप येथील प्राची प्राथमिक विद्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका रुपाली शिंदे होत्या. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी श्रीमंत रुपनर, युवा नेते अनंत म्हेत्रे मंद्रुप ग्रामदैवत श्री मळसिद्ध देवाचे पुजारी यांच्यासह शालेय समिती सदस्य तसेच ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.
यावेळी अनंत म्हेत्रे व बबलू शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रशालेतील विद्यार्थ्यांची मनोगते झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व सहशिक्षक, सहशिक्षिका व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष निरंजन ख्याडे यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बिराजदार तर आभार अविनाश पवार यांनी मानले.

Back to top button