बीड
सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देण्यासाठी पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा -शेख बंन्नुपटेल

सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देण्यासाठी पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा -शेख बंन्नुपटेल
बीड प्रतिनिधी
संत भगवान बाबांची जन्मभूमी सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजप नेत्या पशुसंवर्धन विभाग,
पर्यावरण व हवामान बदल विभाग मंत्री पंकजाताई मुंडे यांचा बहुप्रतिक्षित दसरा मेळावा मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या ऐतिहासिक मेळाव्याला समाजातील सर्व घटक, माता-भगिनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक विकास आघाडी गेवराई चे तालुकाध्यक्ष शेख बंन्नुपटेल यांनी केले आहे.
स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधण्याची, तळागाळातील लोकांचे प्रश्न मांडण्याची आणि समाजातील विविध घटकांना एकाच मंचावर आणण्याची महान परंपरा सुरू केली होती. याच विचारांचा वारसा पुढे चालवत पंकजाताई मुंडे या दसरा मेळाव्याचे यशस्वी आयोजन करत असतात. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विचारांची पेरणी करणारा हा मेळावा आता राज्यातील एक प्रमुख राजकीय व सामाजिक पर्व बनला आहे.
पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे व देशाचे लक्ष लागलेले असते. या मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक, समर्थक व नागरिक आवर्जून उपस्थित राहत असतात.
यंदाच्या या भव्य मेळाव्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक बांधिलकी, सलोखा व एकतेचा संदेश द्यावा, असे आवाहन शेख बंन्नुपटेल यांनी केले आहे.



