📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

युनिटी ग्रुप आणि शौर्य प्रतिष्ठान कोकण यांच्या संयुक्त विद्यमाने साखरोणे येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

युनिटी ग्रुप आणि शौर्य प्रतिष्ठान कोकण यांच्या संयुक्त विद्यमाने साखरोणे येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीवर्धन (संदेश घोलप):श्रीवर्धन तालुक्यातील साखरणे गावामध्ये गणेशोत्सवचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,
ग्रामीण भागातील गरजवंतांना वेळेवर रक्त पुरवठा व्हावा आणि वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगात कोणाचाही जीव धोक्यात येऊ नये, या सामाजिक बांधिलकीतून युनिटी ग्रुप आणि शौर्य प्रतिष्ठान कोकण (आरोग्य, शिक्षण, कला, क्रीडा, कृषी, नोकरी व व्यवसाय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या शिबिराला साखरोणे आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
“थेंब थेंब रक्ताचा… जीवनाला नवा श्वास” आणि “रक्तदान – जीवन दान” हे सूत्र उराशी बाळगून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अपघात, गंभीर आजार किंवा शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताच्या कमतरतेमुळे कोणावरही संकट येऊ नये, या हेतूने हे शिबिर राबवण्यात आले. एका रक्तदात्याने केलेले रक्तदान एकाच वेळी तीन गरजू रुग्णांचे प्राण वाचवू शकते, ही भावना मनात ठेवून अनेक रक्तदात्यांनी या सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेतला.
साखरोणे व परिसरातील तरुण, सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि ग्रामस्थांनी या शिबिरात उपस्थित राहून मोठ्या संख्येने रक्तदान केले. समाजसेवेची ही परंपरा पुढे नेणाऱ्या आणि या उपक्रमात सहभाग नोंदवून गरजू रुग्णांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे व सहकार्य करणाऱ्यांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
Back to top button