📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आज श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता 

आज श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता
भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे:- शांतीब्रह्म नवनाथ बाबा
बीड (प्रतिनिधी) विसाव्या शतकातील महान संत सदगुरू किसान बाबा महाराज यांच्या 28 व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सांगता आज दि.28 ऑगस्ट शुक्रवार रोजी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार संजयजी महाराज पाचपोर रामायणाचार्य  यांचे काल्याचे किर्तन दुपारी 12 ते 2 वाजता होणार आहे. काल्याचे किर्तन झाल्यानंतर महाप्रसादाच्या  महापंगती होणार आहे.
     श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे आज येथे पौर्णिमा निम्मित सदगुरु ह.भ.प.वै.किसान बाबा महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न होणार आहे पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सांगता होणार आहे या पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सांगता कार्यक्रमास सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गुरुवर्य शांतीब्रम्ह ह.भ.प. नवनाथ बाबा महाराज मठाधिपती महंत श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी यांनी केले आहे
        श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे आज अखंड हरिनाम सप्ताह सांगता होणार आहे या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये दि. 28 ऑगस्ट शुक्रवार रोजी पौर्णिमा निम्मित सदगुरु ह भ प वै. किसन बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निम्मित सकाळी पालखी मिरवणूक सोहळा पार पडणार आहे. गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा गुरु किसन बाबा महाराज यांच्या समाधी पूजन होणार महायोगी गोरक्षनाथ महाराज मंदिर अभिषेक व संत साधू बाबा यांची आरती होणार आहे नंतर दत्तगुरु पूजन आरती करण्यात येणार आहे.या नंतर श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे गर्भगिरी पर्वत प्रदक्षिणा हि गुरुवर्य सदगुरू किसान बाबा महाराज यांनी सुरू केली होती हि गर्भगिरी पर्वत प्रदक्षिणा होईल.
     गोरक्षनाथ टेकडी येथे येणाऱ्या भाविक भक्तांच्या साठी पार्किंग, बैठक व्यवस्था, महाप्रसाद वाटप व्यवस्था करण्यात आलेली आहे.
     श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे अखंड हरिनाम सप्ताह मध्ये काकडा भजन, विष्णू सहस्रनाम ,ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन हरिपाठ, प्रवचन, हरी किर्तन, संगीत भजन, भारुड, हरिजागर, असे सात दिवसात चोवीस तास हरिनामाचे नामस्मरण करण्याचे कार्य श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे करण्यात आले. या सर्व हरिनामाच्या कार्याची सांगता उद्या होणार आहे.
चौकट:- महाराष्ट्रातील सर्वात मोठा डोम……
महाराष्ट्रातील सर्वात मोठा लोखंडी भव्य डोम हा श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे आहे. हा डोम 1 एकर 04 गुंढे एवढ्या जागेत आहे या ठिकाणी संजय महाराज पाचपोर यांचे काल्याचे किर्तन या भव्य डोम मध्ये होणार आहे या डोम व्यतिरिक्त दोन एकर रिकाम्या जागेत कीर्तन ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे
चौकट:- महाप्रसादच्या महापांगती ….
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे काल्याच्या कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाच्या महापंक्ती उठवण्याचे काम करण्यात येत आहे या करिता मागील 4 दिवसापासून प्रसाद तयार करण्याचे काम सुरू आहे या महाप्रसादात 61 क्विंटल महाप्रसादाची तयारी सुरू आहे
चौकट:-  गाड्या पार्किंग व्यवस्था….
अखंड हरिनाम सप्ताह करिता येणाऱ्या भाविक भक्तांची पार्किंगची व्यवस्था 10एकर मध्ये फोर व्हीलर गाड्या, 1 एकर मध्ये ऑटो रिक्षा 2 एकर  मध्ये मोटरसायकल गाडीची व्यवस्था अशी एकूण 13 एकर मध्ये पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी आपापली वाहने पार्किंग प्रमाणे लावून सहकार्य करावे
चौकट:- पिंपळनेर पोलिसांचा बंदोबस्त  ….
अखंड हरिनाम सप्ताहच्या सांगता सोहळ्यात होणारी अलोट गर्दी लक्षात घेता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी स्वतः जातीने उपस्थित राहून बंदोबस्त ठेवणार आहेत
Back to top button