बीड

गेवराई नगर परिषदेत बीएलओ व सहाय्यकांची आढावा बैठक संपन्न; मतदार यादी पुनरीक्षणाबाबत विशेष सूचना

गेवराई नगर परिषदेत बीएलओ व सहाय्यकांची आढावा बैठक संपन्न; मतदार यादी पुनरीक्षणाबाबत विशेष सूचना
गेवराई, दि. ७ (प्रतिनिधी): गेवराई नगर परिषद येथे मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी मा. मुख्याधिकारी बिघोत यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी दालनात बीएलओ (Booth Level Officer) व सहाय्यकांची आढावा बैठक संपन्न झाली.
बैठकीत मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision) कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी सर्व बीएलओ व सहाय्यकांना मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, नवीन मतदारांचा समावेश, मृत व स्थलांतरित मतदारांची नावे नियमानुसार वगळणे, तसेच प्रत्येक घराची प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती अचूकपणे संकलित करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच कोणताही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहू नये, सर्व अर्ज विहित मुदतीत ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत, आवश्यक कागदपत्रांची काटेकोर पडताळणी करावी, तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून कामकाज पारदर्शक, निष्पक्ष व वेळेत पूर्ण करावे, अशा विशेष सूचना देण्यात आल्या.
यावेळी सर्व बीएलओ, त्यांचे सहाय्यक, सन्माननीय नगरसेवक तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते. मतदार यादी पुनरीक्षणाचे काम प्रभावीपणे व शंभर टक्के अचूकतेने पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले.
Back to top button