बीड

खापर पांगरी येथे फळबाग पिकांसाठी खड्डे खोदणे व भरणे प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

खापर पांगरी येथे फळबाग पिकांसाठी खड्डे खोदणे व भरणे प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न
बीड (प्रतिनिधी): सौ. के. एस. के. कृषी महाविद्यालय, बीड येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत खापर पांगरी, ता. जि. बीड येथे फळबाग पिकांसाठी खड्डे खोदणे व भरणे या विषयावरील प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले.
फळबाग लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे तयार करणे, त्यामध्ये आवश्यक सेंद्रिय व रासायनिक खतांचा समतोल वापर करून जमिनीची सुपीकता वाढविणे तसेच शेतकऱ्यांमध्ये वैज्ञानिक पद्धतीने फळबाग लागवडीविषयी जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
हा उपक्रम महाविद्यालयाचे सचिव डॉ. जी. व्ही. साळुंके सर, प्राचार्य डॉ. एस. पी. मोरे सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. पी. ढोरमारे सर, प्रा. डी. बी. राठोड सर तसेच विषय शिक्षक प्रा. तांबोळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमासाठी गावचे सरपंच तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी फळबाग लागवडीपूर्वी खड्ड्यांचे योग्य माप, खड्डे खोदण्याची पद्धत, शेणखत, माती व इतर आवश्यक घटकांचे मिश्रण तयार करण्याची प्रक्रिया याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच निरोगी व जोमदार रोपांच्या वाढीसाठी योग्य पद्धतीने खड्डे भरण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांनी फळबाग पिकांसाठी खड्डे खोदणे व भरण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. शेतकऱ्यांनी आधुनिक व शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करून फळबाग लागवड करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमात गावातील शेतकरी, ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
Back to top button