📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

अनुदानित बियाणांसाठी परळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी केले ठिय्या आंदोलन !

अनुदानित बियाणांसाठी परळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी केले ठिय्या आंदोलन !

शेतकऱ्यांना बियाणासाठीचे परमिट मिळाले असताना बियाणे देण्यास कृषी सेवा केंद्रांनी नकार दिल्याने शेतकरी संतप्त !

शेतकऱ्यांनी आंदोलन करताच तालुका कृषी अधिकाऱ्यांना आली जाग ; उर्वरित बियाणाची केली मागणी !

परळी(प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम २०२६ साठी १००% अनुदानावर बियाणे देण्यात येते यासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्यक्रमानुसार निवड झालेली असल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालया मार्फत बियाणे घेण्यासाठी परमिट देण्यात आले परंतु सोमवारी ते परमिट घेऊन शेतकरी मोंढ्यात गेल्यास त्यांना बियाणे देण्यास कृषी सेवा केंद्र चालकानी नकार दिला,त्यामुळे आज सकाळी १० वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कोणताही कर्मचारी व अधिकारी नसल्याने कार्यालयात  शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.

याबाबत सविस्तर वृत्त कि,महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा राज्यातील शेतकऱ्याकडून ऑनलाईन अर्ज घेऊन प्रथम येनारास प्रथम प्राधान्य या नियमाप्रमाणे मार्च खरीप हंगाम २०२६ साठी सोयाबीन व इत्तर बियाणे देण्यात येत आहे,त्यानुसार परळी तालुक्यातील १७९२ शेतकऱ्यासाठी ९८३ क्विंटल बियाणे मिळणे परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी केवळ ३५४.२५ क्विंटलच बियाणे मिळाले,त्यामुळे उर्वरित ६२८ .७५ ची आवश्यकता असताना सदरील बियाणे महाबीज कडून मिळाले नाही,त्याच बरोबर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने उर्वरित बियाणाची मागणी सुद्धा आज पर्यंत केली नाही,परळी तालुक्यासाठी १)संजय कृषी सेवा केंद्र,परळी वै.२)रुक्मिणी ट्रेडर्स परळी वै.३)किसान सेंटर परळी वै.व ४)बालाजी कृषी सेवा केंद्र,सिरसाळा हे चार कृषी सेवा केंद्र अधिकृत आहेत,पंरतु या केंद्रांना प्रत्येकी किती बियाणे दिले ? कोणत्या शेतकऱ्याने कोणत्या कृषी सेवा केंद्रावर जाऊन बियाणे घ्यायचे याचे नियोजन करण्यात आले नाही असे असताना फक्त ऑफलाईन परमिट देऊन शेतकऱ्यांना कृषीसेवा केंद्रावर पाठवले त्यामुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्याना मागील ५ दिवसात दररोज परळीत येऊन त्रास सहन करावा लागला,त्यामुळे शेकडो संतप्त शेतकऱ्यानी आज ९ जून रोजी सकाळी १० वाजता कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले,त्यावेळी आम्हाला का बियाणे मिळाले नाही याचा जाब तालुका कृषी अधिकारी यांना शेतकऱ्यांनी विचारले असता आम्ही काय करावे ? जेवढे बियाणे आले तेवढे वाटप केले ? आमच्याकडे काहीच नाही? तुम्हीच महाबीज च्या अधिकाऱ्याना बोला,त्यावेळी शेतकऱ्यानी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले आणखी काही  बियाणे उपलब्ध होईल त्यासाठी यादी बनवून घेतली व सर्व शेतकऱ्याना बियाणे दिले जाईल असे सांगितले व जिल्हा अधीक्षक कृषी,बीड यांना पत्र देऊन उर्वरित ६२८.७५ क्विंटल ची मागणी लेखी पत्रा द्वारे केली,त्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले,पंरतु हे आंदोलन केल्यावरच जाग येऊन उर्वरित बियाणाची का मागणी केली ? या अगोदर मागणी का केली नाही असा सवाल शेतकऱ्यानी उपस्थित केला आहे,यावेळी सिद्धेश्वर मुंडे,नामदेव गित्ते,चंद्रहास गित्ते,शामसुंदर गित्ते,तुकाराम गित्ते,रामप्रभू गित्ते यांच्यासह परळी तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी उपस्थित होते.

Back to top button