बीड
मातोश्री विद्यालयात लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांचा स्मृतीदिन साजरा

मातोश्री विद्यालयात लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांचा स्मृतीदिन साजरा
बीड तालुक्यातील आदर्शगाव वंजारवाडी येथील छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे सचिव मा.श्री. ॲड. सर्जेराव तात्या तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते स्वर्गीय गोपिनाथरावजी मुंडेसाहेब यांचा स्मृतीदिन सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. नागरगोजे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. भुतकर सर व श्री. डोंगरे सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी प्राचार्य नागरगोजे सर, श्री. भुतकर सर, श्री. जाधव सर, श्री. डोंगरे सर व श्री. तांदळे सर यांनी गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व लोकहितकारी कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. बिनवडे सर व श्री. हानुमंत दादा तांदळे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोमेश तांदळे यांनी केले.



