बीड
जनतेच्या मनातील “जिजा” : जनसेवा, निष्ठा आणि लोकसंपर्काचा विश्वासार्ह चेहरा

जनतेच्या मनातील “जिजा” : जनसेवा, निष्ठा आणि लोकसंपर्काचा विश्वासार्ह चेहरा
ॲड. भगवानराव घुंबार्डे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
गेवराई शहराच्या राजकीय, सामाजिक आणि जनसेवेच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे गेवराई नगरपरिषदेचे उपाध्यक्ष ॲड. भगवानराव घुंबर्डे (जिजा) हे सर्वसामान्य जनतेच्या मनातील विश्वासाचे नाव आहे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे, अडचणीच्या काळात मदतीचा हात देणे आणि समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे मानणे ही त्यांची कार्यशैली त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते.
कोणत्याही प्रकारचे भांडण, तंटे किंवा सामाजिक वाद निर्माण झाल्यास ते मध्यस्थीची भूमिका पार पाडत सामंजस्याने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः दुःखाच्या प्रसंगी गरजू कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आधार देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. त्यामुळे समाजात त्यांच्याबद्दल आदर आणि आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी हजारो निराधार, विधवा, दिव्यांग आणि गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. जवळपास ४० हजार लाभार्थ्यांच्या योजना मंजूर होण्यासाठी त्यांनी केलेले योगदान उल्लेखनीय आहे. प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता जनतेसाठी केलेले कार्य हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे. राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपल्या नेत्यांप्रती निष्ठा आणि समर्पण कायम राखले आहे. माजी आमदार लक्ष्मण आण्णा पवार, युवा नेते बाळराजे दादा पवार आणि नगराध्यक्षा सौ. गीताभाभी पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे.
प्रभाग क्रमांक ५ हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. या भागातील नागरिक त्यांच्यावर अपार विश्वास ठेवतात. “जिजा आहेत, म्हणजे आपला माणूस आहे,” अशी भावना अनेक नागरिक अभिमानाने व्यक्त करतात. नगरपरिषदेवर सलग तीन वेळा निवडून येणे ही त्यांच्या लोकप्रियतेची आणि जनाधाराची साक्ष आहे. नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, नाल्या, लाईट व्यवस्था यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केला आहे. नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी ते तत्पर असतात. २४ तास सुरू असलेला त्यांचा मोबाईल आणि कोणालाही सहज उपलब्ध होणारा स्वभाव ही त्यांची खास ओळख बनली आहे.
घुंबार्डे कुटुंब हे एकत्रित कुटुंबपद्धतीचे आदर्श उदाहरण आहे. त्यांच्या परिवारातील सर्व भाऊ निर्व्यसनी व उद्योजक असून समाजाप्रती असलेली बांधिलकी त्यांनी जपली आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांच्या घराचे दरवाजे सदैव खुले असतात.
साधी राहणी, प्रामाणिक विचार आणि जनसेवेची तळमळ यामुळे अनेकजण त्यांच्याबद्दल “मूर्ती लहान पण कीर्ती महान” असे गौरवोद्गार काढतात. जनतेशी असलेला दांडगा संपर्क, सेवाभावी वृत्ती आणि विकासकामांप्रती असलेली निष्ठा यामुळे ॲड. भगवानराव घुंबार्डे (जिजा) हे गेवराईच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात. दि. 1 जून रोजी त्यांचा वाढदिवस असून
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
शुभेच्छुक :
राधाकिसन मोटे
समाजसेवक, गेवराई



