बीड

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

*स्वतः भेट घेण्याची दाखवली तयारी ; जरांगे पाटील यांनी  कडक उन्हात उपोषणास बसणे प्रकृतीसाठी योग्य नाही*

मुंबई दि. ३० —
मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी कडक उन्हात आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्यावी, असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

ना. पंकजाताई मुंडे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठवून निर्देश दिले आहेत. ना. पंकजाताई म्हणाल्या की, मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी श्री मनोज जरांगे पाटील भर उन्हात जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. जिल्हाधिकारी जिल्हयाच्या प्रशासनाचे प्रमुख असतात, या नात्याने आपण त्यांची तात्काळ भेट घ्यावी अशी माझी सूचना आहे. अशा कडक उन्हात त्यांचं आमरण उपोषण त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य नाही.

*स्वतः भेटण्याची दाखवली तयारी*
—–
जिल्हयाची पालकमंत्री म्हणून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आवश्यक असल्यास मी  येण्यास देखील तयार आहे. आपण तात्काळ जावून त्यांची भेट घ्यावी, त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे निवेदन स्वीकारावे असे ना. पंकजाताईंनी म्हटले आहे.

Back to top button