बीड

श्रीवर्धन तालुका आणि मुंबई कमिटीची संयुक्त बैठक; विकासकामांना गती देण्यावर चर्चा

श्रीवर्धन तालुका आणि मुंबई कमिटीची संयुक्त बैठक; विकासकामांना गती देण्यावर चर्चा
श्रीवर्धन (संदेश घोलप)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटन बांधणीला आणि श्रीवर्धन तालुक्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आज मुंबईतील मुख्य कार्यालयात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थानिक कमिटी आणि मुंबई कमिटीच्या वतीने संयुक्तपणे तालुक्यातील विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीदरम्यान श्रीवर्धन तालुक्यात सध्या सुरू असलेल्या विविध शासकीय योजना आणि विकासकामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच, आगामी काळात हाती घ्यावयाच्या नवीन विकासकामांचे नियोजन आणि पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा व विचारविनिमय झाला.
या बैठकीला श्रीवर्धन तालुक्यातील नवनिर्वाचित आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये नवनिर्वाचित श्रीवर्धन पंचायत समिती सभापती मा. सुचिनजी कीर, नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष श्री. मंदारजी तोडणकर, नवनिर्वाचित कार्याध्यक्ष श्री. संदेशजी काते, युवक अध्यक्ष श्री. किरण कांदळेकर, माजी पंचायत समिती सदस्य श्री. मंगेशजी कोमनाक, श्री. मंगेशजी गुणाजी यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्षीय मजबुतीसाठी ही आढावा बैठक अत्यंत यशस्वी ठरल्याचे मत यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले.
Back to top button