बीड
बीड,लातूर,धाराशिव स्थानिक स्वराज्यसंस्था मतदार संघातून रमेश आडसकर यांना उमेदवारी द्यावी :-राजेश सोळंके

बीड,लातूर,धाराशिव स्थानिक स्वराज्यसंस्था मतदार संघातून रमेश आडसकर यांना उमेदवारी द्यावी :-राजेश सोळंके
माजलगाव (प्रतिनिधी ) गेल्या अनेक वर्षापासून मधला काही काळ वगळला तर रमेश आडसकर यांनी अजित दादा यांच्या म्हणण्यावर लोकसभा विधानसभेच्या निवडणुका लढवल्या माजलगाव तालुक्याचे राजकारण पाहता मधल्या काळामध्ये रमेश आडसकर साहेब यांनी एक विधानसभा भाजपाकडून तर एक विधानसभा अपक्ष लढून माजलगाव तालुक्यातील जनतेची साथ सिद्ध केलेली आहे रमेश आडसकर साहेब हे पूर्वीपासून अजित दादा पवार यांचे खंदे समर्थक होते मात्र काही काळ त्यांनी जनतेच्या विकासाची आस मनात ठेऊन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र उद्देश साध्य झाला नाही आणि अडसकर यांनी राष्ट्रवादी अजित दादा यांचे नेतृत्व स्वीकारले रमेश आडसकर यांनी अजित दादा यांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून अजित दादा पवार यांना भावाप्रमाणे साथ देण्याचा प्रयत्न केला आहे एकेकाळी हाबाडा
फेम म्हणून ओळखले जाणारे बाबुरावजी आडसकर यांनी काँग्रेस पक्षात असताना माजी मंत्री तथा माजी आमदार पंडितरावजी दौंड यांना पराजित करून नावलौकिक मिळवला होता तेव्हापासून बाबुरावजी आडसकरांसह आडसकर घराणा हाबाडा फेम म्हणून ओळखला जाऊ लागला आहे बाबुराव आडसकर यांना मानणारा बीड जिल्ह्यात मोठा वर्ग आहे त्या वर्गाची नाळ न तुटू देता रमेश आडसकर आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत गोरगरीब, दिन दुबळा, दलित, कामगार, शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न करतात पक्ष कोणताही असो रमेश आडसकर यांचे प्रस्थ वेगळेच आहे आणि ते सिद्ध झालेले आहे त्यामुळेच अजित दादा पवार यांनी रमेश आडसकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देऊन हसतमुखाने स्वागत केल्याचे दिसून येत आहे रमेश आडसकर म्हणजे सर्वसामान्य गरिबीच नेतृत्व म्हणून ओळखले जातात मात्र अजित दादा पवार यांच्या अकाली मृत्यू मुळे हवालदिल पाहायला मिळत आहेत अजित दादा पवार असते तर रमेश आडसकर बीड लातूर धाराशिव विधान परिषदेचे उमेदवार म्हणून घोषित झाले असते मात्र अजित दादा पवार यांच्या अकाली निधनामुळे रमेश आडसकर यांचे आमदार होण्याचे स्वप्न पक्षाच्या प्रमुख महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्या सुनित्रा ताई पवार याच्या हातात असून त्या निश्चित च उमेदवारी देऊन साकार करतील अशी अपेक्षा बीड लातूर धाराशिव येथील स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदार व्यक्त करत आहे त्यामुळे बीड लातूर धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून सर्वांचे आवडते आणि लोकप्रिय नेते रमेश रावजी आडसकर साहेब यांना बीड लातूर धाराशिव या स्थानिकस्वराज्य मतदार संघातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी तरुण तडफदार युवा उद्योजक राघव ज्वेलर्सचे मालक राजेश सोळंके यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुनेत्रा ताई अजित दादा पवार यांच्याकडून जनतेतील लोकप्रिय सर्वसाधारण जनतेचे तारणहार रमेश रावजी आडसकर साहेब यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा राजेश सोळंके व्यक्त केली आहे



