अंतर्मनात भगवंताविषयी निस्वार्थ भाव ठेवूनभक्ती केली की उद्धार होतोच — ह.भ.प. केशवदास वैष्णव महाराज

अंतर्मनात भगवंताविषयी निस्वार्थ भाव ठेवूनभक्ती केली की उद्धार होतोच — ह.भ.प. केशवदास वैष्णव महाराज
बीडप्रतिनिधी….
येथून जवळच असलेल्या मुक्ताई नगर येथे अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला श्रीराम कथा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू आहे. कालच्या कथेमध्ये अत्यंत भावनिक आणि भक्तिरसपूर्ण प्रसंग अनुभवायला मिळाले.प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेका वेळी माता कैकयी ने दोन वर मागून राज्यभिषेकांमध्ये विघ्न निर्माण करून रामाला वनवासाला पाठवले. हा कथा भाग झाला
यावेळी महाराजांनी सांगितले की बाल हट्ट, स्त्री हट्ट,आणि राज हट्ट हे पूर्वावेज लागतात त्याप्रमाणे राम वनवासाला जाण्याची तयारी करत असताना त्यांनी अंगावरील भरजरी वस्त्रे उतरवून वल्कल धारण केले. हा प्रसंग पाहताना संपूर्ण सभामंडप भारावून गेला होता. उपस्थित भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. ही कथा सांगताना महाराजांनी सांगितले की आपण केलेले कर्म हे देवाला चुकले नाहीत आपण तर साधी माणसे आहोत त्यामुळे आपले नितेश जीवन जगत असताना आपण सत्कर्म करा प्रेम आदर भाव माया आणि सर्व विषयी करून बाळगा असाही अनमोल संदेश दिला
पुढील कथा भागात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता शरयू नदीच्या तीरावर पोहोचल्याचा प्रसंग वर्णन करण्यात आला. त्या ठिकाणी नावाडी भक्त केवटाची झालेली भेट आणि प्रभूप्रती त्याची अखंड भक्ती ऐकताना कृत्यांच्या डोळ्यासमोर संपूर्ण रामायण उभे राहिले. प्रभू श्रीरामांविषयीचे केवटाचे प्रेम आणि भक्ती पाहून भगवानही भारावून गेले. केवटाच्या विनंतीनंतर प्रभू श्रीराम त्याच्या घरी गेले आणि तेथे झालेल्या प्रभूंच्या वाद्यपूजनाच्या प्रसंगाने सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले.
“भगवंताचे चरण आपल्या दारात आले” ही भावना अनुभवताना अनेक भाविकांना अश्रू अनावर झाले. याच कथेमध्ये दुपारच्या सत्रात अहिल्या उद्धाराचा प्रसंगही रंगला. भगवान श्रीरामांनी केवळ सजीवांचाच नव्हे, तर भक्तीमुळे शिळा बनलेल्या अहिल्येचाही उद्धार केला. प्रभूंच्या चरणातील धुळीचा स्पर्श होताच त्या शिळेतून दिव्य स्त्रीरूपात अहिल्या प्रकट झाली. हा प्रसंग ऐकताना उपस्थित भाविक विस्मयचकित झाले होते.
या कथा सोहळ्याचे श्रवण करण्यासाठी बीड येथून महावीर बोरा, कुलकर्णी, निवृत्ती महाराज मुंडे , साईनाथ दुधाळ, तसेच पंचक्रोशीतील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कथेला संगीताची साथ गायक म्हणून ह.भ.प. सुग्रीव महाराज यांचे सुरेल गायन आणि उत्कृष्ट तबलावादक ह.भ.प. रामेश्वर महाराज जाधव यांची साथ लाभत आहे. या राम कथेमुळे संपूर्ण परिसर सध्या रामभक्तीमध्ये तल्लीन झालेला दिसून येत आहे.



