बीड

राजारामबापू पाटील साखर कारखाना साखराळे युनिटच्या आधुनिकीकरणाचे काम गतीने सुरू : चेअरमन प्रतिक पाटील

राजारामबापू पाटील साखर कारखाना साखराळे युनिटच्या आधुनिकीकरणाचे काम गतीने सुरू : चेअरमन प्रतिक पाटील
*ईश्वरपूर दि. (प्रतिनिधी)*
*इकबाल पीरजादे*
 राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिटच्या आधुनिकी करणाचे काम गतीने सुरु असूनही ऊ येत्या ३० ऑगस्ट पर्यंत हे काम पूर्ण केले जात आहे.येत्या गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये साखराळे युनिटमध्ये प्रतिदिन दहा हजार पाचशे मेट्रीक टन क्षमतेने गाळप करु,असा विश्वास राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी व्यक्त केला.ते साखरळे युनिटच्या गळीत हंगाम २०२६-२७ च्या मिल रोलर पूजनप्रसंगी बोलत होते. प्रारंभी प्र.कार्यकारी संचालक विजय मधुकर मोरे यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले.याप्रसंगी राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पवार,प्रदिपकुमार पाटील, कार्तिक पाटील,अतुल पाटील,विठ्ठल पाटील, शैलेश पाटील,प्रताप पाटील,दादासाहेब मोरे, अमरसिंह साळुंखे,रमेश हाके,रघुनाथ जाधव, राजकुमार कांबळे, दिलीपराव देसाई, प्रा.डॉ. योजना शिंदे-पाटील, दीपक पाटील,रामराव पाटील वैभव रकटे प्रामुख्याने उपस्थित होते.
     प्रतिकदादा पुढे म्हणाले साखराळे युनिटमध्ये आपण प्रतिदिन सात हजार मेट्रीक टन उसाचे गाळप करीत होतो. मात्र यावर्षी आपण आधुनिकी करणाचे काम पूर्ण करीत असल्याने प्रतिदिन दहा हजार पाचशे मेट्रीक टनाप्रमाणे गाळप करणार आहोत. आधुनिकीकरणाची कामे गतीने पूर्ण केली जात आहेत. येत्या गळीत हंगामासाठी आपल्या चारही युनिटमध्ये पुरेशा उसाची नोंद झाली असून सक्षम ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणा उभा केली आहे. साखराळे युनिटसाठी चारशे ट्रॅक्टर, चारशे अंगद,सहाशे बैलगाड्या आणि २० मशीन चे करार पूर्ण झाले आहेत. यावेळी त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस आपल्या साखर कारखान्यास देऊन सहकार्य करावे,असे आवाहन केले.
प्रारंभी प्र.कार्यकारी संचालक विजय मधुकर मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी आभार मानले. यावेळी सचिव डी.एम.पाटील संदीप पाटील,प्रेमनाथ कमलाकर,उमेश सुतार,धैर्यशील पाटील,जे.बी.पाटील,धनाजी लाड,संभाजी खोत,डॉ. प्रकाश म्हाळुंगकर,राजेंद्र पाटील,सुनिल जाधव, संजय गुरव,मुकेश करळे,यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Back to top button