बीड

शिक्षक सूरज डाडर यांना दुचाकीची धडक; गंभीर जखमी

शिक्षक सूरज डाडर यांना दुचाकीची धडक; गंभीर जखमी

जामखेड प्रतिनिधी : शहरातील इंदिरा वस्ती येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक सूरज डाडर हे शनिवारी (दि.१६ मे) आपल्या सहकारी शांतू वाघमारे यांच्यासह काही कामानिमित्त वडगाव येथे गेले होते.
परतीच्या प्रवासादरम्यान खर्डा परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या अपघातात सूरज डाडर हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी भगवंत हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच भाजपा युवा तालुका अध्यक्ष संतोष गव्हाळे व सागर टकले यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. प्राथमिक उपचारानंतर सूरज डाडर यांना पुढील उपचारासाठी जामखेड येथे हलविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अज्ञात वाहन चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Back to top button