बीड
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस पाच वर्ष कारावासाची शिक्षा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस पाच वर्ष कारावासाची शिक्षा
मा. तदर्थ जिल्हा व सत्र न्यायधीश-१ सुरेश. एस. घोरपडे साहेब यांचा महत्वपूर्ण निकाल
बीड( प्रतिनिधी )दिनांक. १९/०३/२०२३ रोजी सकाळी ०७.०० वाजता आरोपी याने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्यााप्रकरणी इस्लामपुरा बीड येथील रहिवाशी असलेला आरोपी नामे. शेख युनुस शेख लाल यास मा. तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब मा. सुरेश एस. घोरपडे साहेब यांनी दोषी ठरवून ५ वर्ष सश्रम करावास व १०,०००/रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सदर प्रकरणात सहा सरकारी वकिल अॅड. अजय श्रीमंतराव तांदळे यांनी काम पाहिले या प्ररकणी थोडक्यात हकिगत अशी की, दिनांक १९/०३/२०२३ रोजी सकाळी ०७. ०० वाजता मुलगी ही गल्लीतील शेख युनुस याचे चहा पाण्याचे हॉटेल वर असता ती आर्ध्या तासाने घरी परत आली तीला मी उशिर का झाला असे विचारले असता ती रडू लागली म्हणून तीला विचारले असता तिने सांगितले की, मी दुध आणन्यासाठी युनुस चाचा यांचे चहाचे हॉटेल समोर उभी असतांना मी दुध घेतले तेव्हा मला युनुस चाचाने हॉटेलमध्ये बोलावले मी हॉटेलजवळ गेले असता युनुसचाचाने मला हॉटेलमध्ये बोलावले मी आतमध्ये जाण्यास नकार दिला असता त्यांनी माझा हाताना धरून हॉटेलमध्ये ओढले व माझे गळयास मिठी मारली मी त्यास मला सोड असे म्हणाले असता त्याने मला हॉटेलच्या आतील बाजूस ओढण्याचा प्रयत्न करू लागला व त्याने त्याचे पॅन्टची चैन खोलली तेव्हा मी मोठयाने ओरडू लागले तेव्हा सयद शहानवाज इकबाल हे तेथे आले व त्यांनी युनुस यास तु क्या कर रहा है तेरे बच्चीकी उमरकी है असे म्हणून त्यास शिवीगाळ करून दोन चापटा मारल्या व मला तु घरी जा असे म्हणाले. तेव्हा मी घरी आले.
पिडीतेच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन पेठ बीड येथे आरोपी विरूध्द कलम ३५४-अ भादवी आणि कलम ८, १२ बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंध्द कायदा सन २०१२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. सदर फिर्यादीवरून तात्कालील सपोनि जी.एल. अंतरप यांनी या प्रकरणाचा तपास केला व जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे आरोपी विरूध्द दोषारोपपत्र दाखल केले.
सदर प्रकरणी सुनावणी मा. तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब मा. सुरेश एस. घोरपडे साहेब बीड यांच्या न्यायालयात झाली. सदर आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे एकुण ०६ साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणातील फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाले असतांना सदर प्रकरणात केवळ पिडीता, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी, व इतर साक्षीदार यांचा पुरावा व सहा सरकारी वकिल अजय श्रीमंतराव तांदळे यांचा युक्तीवाद ग्राहय धरून मा. तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब मा. सुरेश एस. घोरपडे साहेब यांनी आरोपी यास कलम ३५४-अ भादवी आणि कलम ८, १२ बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंध्द कायदा सन २०१२ अन्वये यांनी दोषी ठरवून ५ वर्ष सश्रम करावास व १०,०००/रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर प्रकरणात सहा सरकारी वकिल अजय श्रीमंतराव तांदळे यांनी काम पाहिले. तपास अधिकारी सपोनि जी.एल. अंतरप व पैरवी अधिकारी श्री. ऋषीकेश सानप व कोर्ट ड्यूटी बाळासाहेब सानप यांनी सहकार्य केले.



