बीड

मुस्लिम आरक्षण मोर्चाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा

मुस्लिम आरक्षण मोर्चाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा
बीड: मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावे या मागणीसाठी १७ एप्रिल रोजी बीड शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला संभाजी ब्रिगेड, बीड जिल्ह्याच्या वतीने अधिकृतपणे जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला आहे.
संभाजी ब्रिगेडने नेहमीच बहुजन आणि अल्पसंख्याक समाजाच्या न्याय्य हक्कासाठी भूमिका घेतली आहे. मुस्लिम समाजातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय सहभागी होऊन आपला पाठिंबा दर्शवतील, असे जिल्हा शाखेच्या वतीने कळवण्यात आले आहे.
Back to top button