बीड

अस्मिता फंक्शन हॉलचे उद्घाटन संपन्न

अस्मिता फंक्शन हॉलचे उद्घाटन संपन्न

बीड (प्रतिनिधी):- शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांना आधुनिक व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या अस्मिता फंक्शन हॉल या भव्य वास्तूचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते फित कापून या हॉलचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संभाजी विठ्ठलराव शिंदे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. योगेश क्षीरसागर यांची उपस्थिती लाभली.
या सोहळ्यास शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, राजकीय पदाधिकारी, उद्योजक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते फित कापून व शुभारंभ करून हॉल सर्वांसाठी खुला करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या उपक्रमाचे स्वागत केले.
कार्यक्रमा दरम्यान बोलताना तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले की, शहरात अशा आधुनिक आणि सुसज्ज हॉलची गरज होती. अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांना त्यांच्या विविध समारंभांसाठी सोयीस्कर पर्याय उपलब्ध होतो. तसेच अशा उपक्रमांमुळे शहराच्या विकासाला चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अस्मिता फंक्शन हॉल हा केवळ फंक्शन हॉल नसून समाजाच्या गरजांमधून उभा राहिलेला एक उपयुक्त उपक्रम आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडणार्‍या दरात स्वच्छ, सुसज्ज आणि आधुनिक सुविधा मिळणे ही काळाची गरज आहे. या माध्यमातून अनेक कुटुंबांचे समारंभ अधिक सुलभ व आनंददायी होतील. अशा सकारात्मक उपक्रमांमुळे शहराच्या विकासाला चालना मिळते. आयोजकांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेले हे कार्य कौतुकास्पद असून, भविष्यातही त्यांनी असेच समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. संभाजी विठ्ठलराव शिंदे यांनी सांगितले की, हा हॉल उभारताना केवळ व्यवसायाचा विचार न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
या फंक्शन हॉलमध्ये विवाह सोहळे, साखरपुडा, वाढदिवस समारंभ, स्नेहसंमेलने, शैक्षणिक कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम तसेच विविध बैठका आयोजित करण्यासाठी प्रशस्त व वातानुकूलित व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 200 लोकांची बैठक व्यवस्था, आकर्षक सजावट, प्रशस्त स्टेज, पार्किंग सुविधा आणि स्वच्छता यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांसाठी हा हॉल एक उत्तम पर्याय ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ.पांडुरंग सुतार यांनी केले तर आभार प्रदर्शनही नितीन हातागळे यांनी केल. आजपासून अस्मिता फंक्शन हॉल हा हॉल सर्वसामान्य नागरिकांसाठी सेवेत दाखल करण्यात आला असून, शहरातील सामाजिक व सांस्कृतिक जीवनात तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मंचावर ज्येष्ठ शिक्षक नेते उत्तमराव पवार, प्रा. प्रदीप रोडे, उपनगराध्यक्ष विनोदभैय्या मुळुक, आमेरभैय्या सिद्दीकी, नगरसेवक शुभम धूत, शुभम कातांगळे, मंगेश धोंगडे, रामदास सरवदे, विधीज्ञ नागेश तांबरे, संपादक साहस आदोडे, माजी पोलीस निरीक्षक तान्हाजी शिनगारे, माजी सहायक निबंधक विधीज्ञ हनुमंत कांबळे, प्रा. डॉ. सचिन तांदळे, माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुदाम मोगले, अरुणाताई आठवले, प्रा. राम गायकवाड, विधीज्ञ मनोज वाघमारे, सुमेध जोगदंड, माजी पोलीस अधिकारी अशोक ठोकळ, कॅप्टन राजाभाऊ आठवले, भारतीय डाक अधिकारी अमरसिंग ढाका, बाबाजी वानखेडे, डॉ. संध्या घुगे, डॉ. तेजस्विनी घुगे, अभिनेत्री सोनाली शहाणे, सुभाष लोणके, बाळासाहेब पौळ, एस.एम. जोगदंड, गुलाबराव भोले, प्रा. दिपक जमधाडे, प्रा. डॉ. संजय कांबळे, इंजी. वचिष्ट तावरे, भारत मगर, प्रा. बाळासाहेब जाधव, माजी सहायक पोलीस निरीक्षक भास्कर कांबळे, बाबुराव गालफाडे, राजेंद्र गालफाडे, कर सल्लागार विधीज्ञ गणेश शिंदे, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष जीवन घोलप, प्रा. डॉ. खान, प्रा. डॉ. इमाद अख्तर, प्रा. डॉ. शेख शकील, सौ. सुनीता सानप, अनिता खंडागळे, डॉ. शशिकांत उम्रजकर, सुग्रीव तावरे, महादेव नागरगोजे, धर्मराज मुजमुले, आबासाहेब चव्हाण, माजी उप अभियंता संजय पवार, मुख्याध्यापिका कांचन शिंदे, राजकुमार ससाणे, प्रितेशदादा इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Back to top button