बीड
चकलांबा पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर अवैध धंद्यांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये संताप

चकलांबा पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर अवैध धंद्यांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये संताप
—————————— ———-
खमक्या अधिकारी देण्याची नागरिकाकडून मागणी
——————-
गेवराई (प्रतिनिधी) चकलांबा पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरच अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सपोनि सचिन इंगळे यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांना उधाण आले आहे. परिसरात खुलेआम अवैध दारू विक्री, पत्त्यांचे क्लब, गुटखा, मटका तसेच अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी दिवसाढवळ्या दारू विक्री होत असल्याचेही सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर “पोलीस ठाणे असतानाही अवैध धंदे कसे काय फोफावतात?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. कायद्याचा धाक राहिलेला नाही का, असा प्रश्नही सर्वसामान्यांमध्ये चर्चिला जात आहे.दरम्यान, चकलांबा पोलीस स्टेशनमध्ये सक्षम आणि कडक कारवाई करणारे अधिकारी नियुक्त करावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करून परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूणच, चकलांबा परिसरात वाढलेल्या अवैध धंद्यांमुळे प्रशासनाची कार्यक्षमता पुन्हा एकदा चर्चेत आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
चौकट ….. एक ठाणे दोन चौक्या तरी अवैध धंदे सुरू
चकलांबा पोलीस स्टेशनसह दोन दूरसंचार (चौकी) एक तितरवंणी तर दुसरी उमापुर पोलीस चौकी असून तरीसुद्धा अर्थपूर्ण व्यवहारामुळे या परिसरात अवैधरित्या धंद्याने वर्तुळ काढले असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. म्हणून चिखली अबा पोलीस स्टेशनला खामक्या अधिकारी देण्याची मागणी परिसरातील नागरिकाकडून होत आहे व या परिसरातील अवैध बंद करण्याची मागणी ही यावेळी कर्तव्यदक् असलेले
पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालावे अशी मागणी यावेळी केली आहे



