शिक्षणाची गोडी वाढवण्यासाठी ‘पट वाढवा’ उपक्रम उपयुक्त – केंद्रप्रमुख राम निकम

शिक्षणाची गोडी वाढवण्यासाठी ‘पट वाढवा’ उपक्रम उपयुक्त – केंद्रप्रमुख राम निकम
तपनेश्वर शाळेत पहिली प्रवेशाला सुरवात
चि.शौर्यप्रताप पवार दाखल
जामखेड प्रतिनिधी : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘पट वाढवा’ उपक्रमांतर्गत पुढील २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला सुरुवात झाली. शहरातील तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे या उपक्रमांतर्गत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज पवार यांचे चिरंजीव शौर्यप्रताप रेश्मा धनराज पवार यांना आज दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी इयत्ता पहिलीसाठी प्रवेश देण्यात आला.
यावेळी केंद्रप्रमुख राम निकम, मुख्याध्यापक मच्छिंद्र खैरे, उपाध्यापक प्रताप पवार, संजय आरेकर तसेच उपाध्यापिका जयश्री पाटील, मंगल सोलंकर, शितल कदम, रूपाली कांबळे, कल्पना मोरे, स्वाती गोरे आदी उपस्थित होते.
चौकट
—————
गुढीपाडवा पट वाढवा उपक्रमामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास पालकांकडून मदत होईल. पालकांनीही शिक्षणाबाबत जागरूक राहून आपल्या मुलांना वेळेवर शाळेत दाखल करणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे शिक्षणाची गोडी निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.
मा.श्री.राम निकम
केंद्रप्रमुख, जामखेड



