बीड

श्री शंभूसूर्य संस्थेची खेळाडू राष्ट्रीय पातळीवर ज्ञानेश्वरी धनवेची राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड

श्री शंभूसूर्य संस्थेची खेळाडू राष्ट्रीय पातळीवर

ज्ञानेश्वरी धनवेची राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड
जामखेड प्रतिनिधी : खेलो इंडिया ट्रायबल गेम्स मल्लखांब निवड चाचणी अंतर्गत तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी स्पोर्ट्स ॲकॅडमी येथे महाराष्ट्र संघ निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जामखेडच्या श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेची मल्लखांबपटू कु. ज्ञानेश्वरी नितीन धनवे हिने मुलींच्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.
या यशामुळे तिची २ ते ४ एप्रिल २०२६ दरम्यान अंबिकानगर (छत्तीसगढ) येथे होणाऱ्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ज्ञानेश्वरीच्या या यशामुळे जामखेड तालुक्याचा क्रीडा क्षेत्रात मान उंचावला आहे.
ज्ञानेश्वरीच्या यशामागे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक संतोष (बबलु वस्ताद) टेकाळे, प्रशिक्षक अमोल निमोणकर तसेच अहिल्यानगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे पदाधिकारी आणि तांत्रिक समिती सदस्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, श्री शंभुसूर्य आखाड्याच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी ज्ञानेश्वरीला पुढील वाटचालीस शुभेच्छा देत तिच्या यशाचे कौतुक केले.
Back to top button