बीड
आदिवासी समाजातील नागरिकांना मिळणार 15 वर्षानंतर मिळणार हक्काचे घर

आदिवासी समाजातील नागरिकांना मिळणार 15 वर्षानंतर मिळणार हक्काचे घर
महाराष्ट्र राज्यामधील आगळावेगळा आदर्श पहिला प्रयोग जिल्हा प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून उभा राहणार आदिवासी समाजाची घरकुले.
फोटो कॅप्शन :-जितेंद्र पफाळकर विभागीय आयुक्त संभाजीनगर विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी बीड जतीन रहमान मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड तत्त्वशील कांबळे सामाजिक कार्यकर्ते बीड यांच्या हस्ते झाले घरकुलांचे भूमिपूजन “
बीड( प्रतिनिधी ) बीड पासून जवळ असलेल्या तळेगाव शिवारामध्ये एक एकर जागेमध्ये 17 आदिवासी पारधी समाजातील नागरिकांना प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांच्या माध्यमातून जग मिळवून दिली होती परंतु डोक्यावर हक्काचे छत नसल्यामुळे आजही ते नागरिक स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर ही रस्त्यावर राहत होती लहान बालके भिक्षा मागत होती त्यांना डोक्यावर हक्काचे छत मिळावे व बालकांचे पुनर्वसन होऊन ते शिक्षणाच्या मूळ प्रवाहात यावे याकरिता जिल्हा प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून दि 14/3/2026 रोजी विभागीय आयुक्त संभाजीनगर जितेंद्र पफाळकर, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड जतीन रहमान, अतिरिक्त जिल्हाधिकारी हरीश धार्मिक निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी तहसीलदार चंद्रकांत शेळके गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप नायब तहसीलदार सुहास हजारे गावचे सरपंच घोलप ग्रामविकास अधिकारी चाळक सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे, मनिषा ताई तोकले अशोक तांगडे तो इतर मान्यवरांच्या उपस्थितीत 17 शबरी आवास योजनेच्या घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले.
लवकरच या शबरी आवास योजनेअंतर्गत आदिवासी पारधी समाजाच्या घराचे बांधकाम सुरू होणार आहे यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पफाळकर म्हणाले की प्रत्येक बालक शिक्षणाच्या मूळ प्रवाहात अन्य गरजेचे आहे आजही आपल्या देशामध्ये आदिवासी समाजातील नागरिक रस्त्यावर राहतात हे चुकीचे आहे प्रशासन सदैव आपल्या पाठीशी आहे या तळेगाव पारधी वस्तीवरील रस्ते व विविध विकासासाठी बीड चे प्रशासन व विभागीय आयुक्त म्हणून मी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करेल.
विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी बीड यांनी पुढाकार घेऊन एक महिन्यापासून जमीन मोजणी लेआउट या संदर्भात रोज पाठपुरावा करून सर्व कागदपत्रे आदिवासी समाजातील नागरिकांना काढून दिली 17 नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते आपल्या जागेचे पीटीआर वाटप करण्यात आले यावेळी आदिवासी समाजातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले 2023 मध्ये घर मिळावे याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताना पारधी समाजातील नागरिक आप्पा भुजा पवार यांचा मृत्यू झाला होता त्या अगोदरपासून सतत या नागरिकांचा लढा होता की आम्ही भारतीय नागरिक आहोत व आम्हालाही स्वतःचे हक्काचे घर असावे जेणेकरून आम्ही आमच्या लेकरांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणे व रोजगार मिळवून स्वतःच्या मुलाला शिक्षण देणे हे आमचे स्वप्न होते आता ते सत्यात उतरेल आम्हालाही माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळेल असे नागरिकांना वाटत आहे त्या ठिकाणी बीड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पुढाकार घेऊन काम केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी गत पाच वर्षापासून सदरील कामांमध्ये पुढाकार घेऊन प्रशासनाच्या सहकार्याने तत्कालीन जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार तत्कालीन तहसीलदार सुहास हजारे गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप व इतर अधिकारी व कर्मचारी सर्वांचे सहकार्याने तळेगाव शिवारामध्ये आदिवासी समाजाला एक एकर जागा मिळवून दिली परंतु जागेची मोजणी लेआउट अधिसंदर्भात खूप खर्चिक बाब असल्यामुळे प्रशासनास विनंती करून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आदिवासी समाजाकडे पैसे नसल्यामुळे सर्व कागदपत्रे मोफत उपलब्ध करून दिली पंचायत समिती बीड व ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव वतीने त्या ठिकाणी पाण्याचे बोरवेल घेऊन दिले आहे त्या ठिकाणी बोरवेल भरपूर पाणी लागले आहे त्यामुळे पाण्याची सुविधा निर्माण झाली आहे महावितरण अधीक्षक अभियंता प्रेम सिंह राजपूत यांनी वस्तीवर भेट देऊन त्या ठिकाणी विजेची आवश्यकता जाणून घेऊन वीस लक्ष रुपयाची वीज जोडणी मंजूर केली असून त्या ठिकाणी एक सेपरेट डीपी व विद्युत मंजुरी झाली असून काम सुरू आहे आठ ते दहा दिवसांमध्ये त्या ठिकाणी प्रकाश पडेल, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजी नगर या कार्यालयाकडे येथील नागरिकांना स्वतःचा व्यवसाय व करीता यावा याकरिता व्यवसायासाठीच्या फाईल दाखल करण्यात आलेला आहेत त्या मंजूर झाल्यानंतर त्यांना स्वतःचे छोटे छोटे व्यवसाय सुरू करता येतील व ते आपली उपजीविका आपल्या कष्टावर भागू शकतील अशा सर्व समस्या सोडवण्यासाठी सर्व प्रशासन सामाजिक संघटना यांच्या सहकार्याने आदिवासी पारधी समाजातील एक नवीन वस्ती उभारत असून असे प्रयोग राज्यामध्ये नवे तर देशामध्ये राबवता येतील अशा प्रकारचे काम जिल्हा प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उभा राहिले आहे आजही हजारो आदिवासी पारधी समाज भटकंती करत असतो व रस्त्यावर राहतो त्यांना आजही डोक्यावर छत नाही या बीड जिल्ह्यातील अशा प्रकल्पाला आदर्श मानून तो प्रत्येक ठिकाणी स्वीकारला जाईल व आदिवासी समाजाला हक्काचे घर मिळेल व त्यांची बालके गुन्हेगारी क्षेत्राकडे न वळता शिक्षणाच्या प्रवाहाकडे वळण्यास मदत होईल.


