बीड

स्वच्छता हीच सेवा हा संत गाडगे महाराजांचा संदेश आजही प्रेरणादायी-डॉ.योगेश क्षीरसागर

स्वच्छता हीच सेवा हा संत गाडगे महाराजांचा संदेश आजही प्रेरणादायी-डॉ.योगेश क्षीरसागर
बीडमध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम
बीड (प्रतिनिधी)
दि.२३ : राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी कीर्तनांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. ‘स्वच्छता हीच सेवा’ हा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी आहे. गावोगावी स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करत त्यांनी समाजपरिवर्तनाची दिशा दिली. दीन-दुबळ्यांची सेवा, शिक्षणाचा प्रसार आणि समाजातील वाईट प्रथांविरोधात त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे विचार आजही समाजाला दिशादर्शक ठरत आहेत, असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.
बीड शहरात स्वच्छता, समाजसेवा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.२३) राष्ट्रसंत गाडगे महाराज पुतळा परिसरात त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. योगेश क्षीरसागर अतिथी म्हणून बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गाडगे महाराजांनी अंधश्रद्धा, जातिभेद, व्यसनाधीनता आणि वाईट रूढी-परंपरांविरुद्ध कठोर भूमिका घेतली. दीन-दुबळ्यांच्या सेवेला प्राधान्य देत त्यांनी धर्मशाळा, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे तसेच शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचावी, ही त्यांची भूमिका होती. गाडगे महाराजांचे जीवन अत्यंत साधे, परंतु विचार अत्यंत उंच होते. कृतीतून समाजाला संदेश देत त्यांनी खरी भक्ती ही समाजसेवेत असल्याचे अधोरेखित केले. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा आदर्श घेत स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक समता या मूल्यांसाठी कार्य करणे, हीच त्यांना खरी अभिवादनाची भावना ठरेल, असेही डॉ.क्षीरसागर यांनी नमूद केले. याप्रसंगी नगरसेवक शुभम धुत, मंगेश धोंगडे, राजाभाऊ पिंगळे, अशोक तांबारे, अमोल पौळ, नवगण शिक्षण संस्थेचे संचालक आमेर सिद्दीकी, विठ्ठल गुजर, शुभम कातांगळे, प्रा. रवी शिंदे, विकास यादव, शारदाताई डुलगज तसेच प्रशांत पवार, मोहन राऊत, विक्रम वाघमारे, रमेश घोडके, सुशांत राऊत यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button