बीड
चंपावती महोत्सवाने रचला नवा विक्रम; १९,५७० बालकलाकारांचा सहभाग, ४७२ पारितोषिकांचे भव्य वितरण!

चंपावती महोत्सवाने रचला नवा विक्रम; १९,५७० बालकलाकारांचा सहभाग, ४७२ पारितोषिकांचे भव्य वितरण!
*चंपावती महोत्सवात संस्कार विद्यालय व श्री भगवान इंग्लिश स्कूल ठरले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाकरंडकाचे मानकरी!*
*संसदरत्न खा. डॉ. श्रीकांतजी शिंदे करंडकावर व्हॅल्यू इंटरनॅशनल स्कूल व संस्कार विद्यालयाचा शिक्कामोर्तब!*
===================
बीड, प्रतिनिधी- बीडच्या कलाक्षेत्राला नवा उन्मेष देणाऱ्या सलग चौथ्या वर्षी संपन्न झालेल्या अनिलदादा जगताप फाउंडेशन आणि शिवसेना बीड आयोजित चंपावती महोत्सव उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे महाकरंडक स्पर्धेने नवा विक्रम प्रस्थापित केला. बीड जिल्ह्यातील गेवराई, परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव, बीड, आष्टी, पाटोदा या तालुक्यांमधून, विविध ग्रामीण भागातील गाव खेड्यातून 296 शाळांतील तब्बल १९ हजार ५७० बालकलाकारांनी नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला व रांगोळी या विविध कला प्रकारांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना ४७२ पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. चंपावती महोत्सव विविध स्पर्धेतून बक्षिसांची उच्चांकी संख्या गाठत सर्वोत्तम (शाळा मराठी माध्यम) संस्कार विद्यालय बीड तर (इंग्रजी माध्यम) श्री भगवान इंग्लिश स्कूल, बीड या शाळेने उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे महाकरंडकावर आपले नाव कोरले. तसेच बालकलाकारांचा बीड जिल्ह्यातून सर्वाधिक सहभाग करणाऱ्या संस्कार विद्यालयाल बीड आणि व्हॅल्यू इंटरनॅशनल स्कूल सावरगाव या शाळेला उत्कृष्ट सहभागासाठी संसदरत्न खा. डॉक्टर श्रीकांत शिंदे करंडक देण्यात आला. नृत्य स्पर्धेचे परीक्षण स्वानंदी भारताल आणि आरती अकोलकर यांनी केले तर गीत गायन स्पर्धेचे परीक्षण शेख मजहर आणि सौ सौ धुतेकर यांनी केले. एकपात्री अभिनय स्पर्धेचे परीक्षण प्रा. प्रमोद रामदासी, adv रणजीत वाघमारे आणि चित्रकला रांगोळीचे परीक्षण अमित गाडे यांनी केले.
बीड शहरात सलग दहा दिवस चाललेल्या या भव्य जिल्हास्तरीय चंपावती महोत्सव उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे महाकरंडकाचा बक्षीस वितरण महासोहळा मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत उत्साहात पार पडला. इंग्रजी, मराठी माध्यमांसह जिल्हा परिषद शाळांचा लक्षणीय सहभाग हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. या महोत्सवात केवळ बालकलाकारांचाच नव्हे तर शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाचाही गौरव करण्यात आला. विशेष पारितोषिकांतर्गत अनिलदादा जगताप ‘जिल्हाप्रमुख सन्मान’ प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट मुख्याध्यापक गीता कुलकर्णी (प्रमोदजी महाजन स्कूल, अंबाजोगाई), अन्वर शेख (सिंदफना पब्लिक स्कूल, माजलगाव), दिपाली डाके (रायजिंग स्टार स्कूल, बीड), मेघा बिर्ला (किशोरी इंग्लिश स्कूल, बीड), कीर्ती साळुंके (विनायक विद्यालय, बीड). यांना गौरविण्यात आले. तसेच बेस्ट टीचर पुरस्काराने तुषार बुरगे (आदर्श विद्यालय, बीड), उर्मिला बर्दापूरकर (संस्कार विद्यालय),
शोभा कांबळे (श्री छत्रपती शाहू विद्यालय, बीड), दिनेश दोडके (केएसपी विद्यालय, बीड), कुंदा कुलकर्णी (संस्कार इंग्लिश स्कूल) यांना सन्मानित करण्यात आले.
बेस्ट डान्स टीचर स्वरूपा कुलकर्णी (विवेकानंद बालमंदिर, अंबाजोगाई – पाऊरी नृत्य), बेस्ट म्युझिक टीचर – शुभांगी मोरे (श्री भगवान स्कूल, बीड),
बेस्ट ड्रॉईंग टीचर – प्रसाद देशपांडे (दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल, परळी), बेस्ट ड्रामा टीचर – सखाराम जोशी (सिंदफना पब्लिक स्कूल, माजलगाव) यांना विशेष सन्मान देण्यात आला.
या बक्षीस वितरण महासोहळ्याचे उद्घाटन बीड जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते झाले. “बीड जिल्ह्याची ओळख बनलेला चंपावती महोत्सव भविष्यात महाराष्ट्राची ओळख व्हावी,” अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. या कार्यक्रमाला दै. झुंजारनेताचे संपादक अजित भाऊ वरपे, सौ. आशाताई वरपे, दै. लोकप्रभाचे संपादक संतोषजी मानूरकर, दै. लोकप्रश्नचे संपादक दिलीप भाऊ खिस्ती, शिवसेना धाराशिवचे माजी जिल्हाप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, महिला आघाडी संपर्कप्रमुख संगीताताई चव्हाण, सतीश सोळंके, दिनकरराव कदम, विलासराव बडगे, अरुणनाना डाके, सखाराम मस्के, नानासाहेब काकडे, तान्हाजी कदम, पत्रकार सुरेश जाधव, दीपक जाधव, अमीर हुसेन, उदय नागरगोजे, आकाश सावंत, लक्ष्मीकांत रुईकर, वैभव स्वामी, सतीश शेळके, विकास माने, आनंद वीर यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शेतकरी सेना, ओबीसी व्हिजिलन्स सेना, एसटी कामगार सेना व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंपावती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष प्रतीक कांबळे यांनी प्रास्ताविकात महोत्सवाची सविस्तर माहिती दिली. तर शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी, “बालकलाकारांच्या हक्काचा चंपावती महोत्सव कदापी बंद पडू देणार नाही. हा कलेचा सोहळा अविरत सुरू राहील,” असा निर्धार व्यक्त केला. शिवसेनेचे अनिल खोचरे यांनीही चंपावती महोत्सवातून भविष्यातील कलाकारांची सुसंस्कृत पिढी घडत असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या. कलेचा गौरव, कलाकारांचा सन्मान आणि बीडची सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम करणारा चंपावती महोत्सव यंदाही यशस्वीपणे संपन्न झाला.
चौकट –
*बालकलाकारांच्या हक्काचा चंपावती महोत्सव अखंड सुरू राहील- अनिलदादा जगताप*
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब व संसदरत्न खा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बीडच्या रंगभूमीवर सुरू असलेला चंपावती महोत्सव कदापी बंद पडू दिला जाणार नाही, असा ठाम निर्धार शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी व्यक्त केला. बालकलाकारांच्या हक्काचा आणि कलेचे संस्कार रुजवणारा हा चंपावती महोत्सव बीड जिल्ह्याची भावना बनला असल्याचे त्यांनी सांगितले. चंपावती महोत्सव कलावंत प्रतीक कांबळे व लक्ष्मीकांत दोडके यांच्या कलेवरील प्रामाणिक प्रेमाचे प्रतीक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
•••••



