बीडमध्ये सिटी सर्वे नं.१६८७ वर बेकायदेशीर बांधकाम; तात्काळ कारवाईची मागणी

बीडमध्ये सिटी सर्वे नं.१६८७ वर बेकायदेशीर बांधकाम; तात्काळ कारवाईची मागणी
बीड : येथील शाहुनगर नगरपरिषद हद्द बीड येथील सिटी सर्वे नं.१६८७ या मिळकतीवर रविंद्र उत्तरेश्वर घुंबरे (संबंधित बांधकाम धारक मालक) यांच्याकडून नगरपरिषद, बीड यांनी मंजूर केलेल्या बांधकाम नकाशानुसार बांधकाम न करता, तसेच आवश्यक ती वैध विकास परवानगी प्राप्त न करता, मंजूर नकाशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर व अनधिकृत स्वरूपात बांधकाम करण्यात येत आहे, यामुळे सार्वजनिक सुरक्षितेला धोका निर्माण झाला असून अपघात होण्याची शक्यता टाळता येणारी नाही. याची तात्काळ दखल घेवून बांधकाम धारक मालक रविंद्र उत्तरेश्वर घुंबरे यांच्या कारवाई करावी अशी मागणी औदुंबर गडकर यांनी तक्रारीद्वारे सीओंकडे केली आहे. तक्रारदार औदुंबर गडकर यांनी सीईओंकडे दिलेल्या तक्रारी म्हण्टले आहे की, सिटी सर्वे नं.१६८७ या मिळकतीवर रविंद्र उत्तरेश्वर घुंबरे (संबंधित बांधकाम धारक मालक) यांच्याकडून नगरपरिषद, बीड यांनी मंजूर केलेल्या बांधकाम नकाशानुसार बांधकाम न करता, तसेच आवश्यक ती वैध विकास परवानगी प्राप्त न करता, मंजूर नकाशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर व अनधिकृत स्वरूपात बांधकाम करण्यात येत आहे. सदर बांधकाम हे नगरपरिषदेने मंजूर केलेल्या अटी व शर्तीचे तसेच विद्यमान कायद्यांचे स्पष्ट उल्लंघन करणारे असून, ते अनधिकृत विकास या सदरात मोडते. असे बेकायदेशीर बांधकाम सुरू राहिल्यास सार्वजनिक सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण होण्याची तसेच परिसरातील नागरिकांचे कायदेशिर हक्क बाधित होण्याची दाट शक्यता आहे. सदर प्रकरणी कायदेशीर तरतुदीनुसार तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी सीओंकडे केली आहे. सिटी सर्वे नं.१६८७ येथील सदर बांधकामाची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित बांधकाम धारकास काम थांबविण्याची नोटिस बजावून बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे, तसेच कायद्यानुसार आवश्यक ती दंडात्मक व पाडकामाची कारवाई करण्यात यावी असे म्हण्टले आहे.
………………..बाॅक्स………………
गंभीर बाबीकडे दुर्लक्ष झाल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार : औदुंबर गडकर
“सदर गंभीर बाबीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले अथवा वेळेत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही, तर उच्च प्रशासकीय प्राधिकरण तसेच सक्षम मा. न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचे तक्रारदार औदुंबर गडकर यांनी सांगितले आहे.”



