रायगड

गोरेगाव रोहिदासनगर येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी.

गोरेगाव रोहिदासनगर येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी.

विशेष प्रतिनिधी : नंदकुमार चांदोरकर

दि. १ फेब्रुवारी २०२६
माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रोहिदासनगर येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. संत रोहिदास विकास मंडळ गावकी, संत रोहिदास तरुण मंडळ तसेच पुरस्कृत गोरेगावचा राजा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही या जयंतीचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त दि. २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये सांस्कृतिक सादरीकरण, स्पर्धा, खेळ तसेच सामाजिक उपक्रमांद्वारे तरुणाईला सहभागी करून घेण्यात आले.
जयंती कार्यक्रमास गोरेगाव परिसरातील सर्व पक्षीय उमेदवार, विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. तसेच गोरेगाव रोहिदासनगर येथील तिन्ही मंडळांचे सर्व सदस्य, पदाधिकारी, युवक-युवती आणि परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या समता, बंधुता व सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या जयंती उत्सवामुळे संपूर्ण परिसरात आनंदी व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडल्याने आयोजक मंडळांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

Back to top button