बीड

एकही बंजारा तांडा विकासापासून वंचित राहणार नाही – अमरसिंह पंडित

एकही बंजारा तांडा विकासापासून
वंचित राहणार नाही – अमरसिंह पंडित
एक कोटी रुपये किंमतीच्या जांभळी तांडा रस्त्याचा भव्य शुभारंभ

गेवराई, दि.२४ (प्रतिनिधी) ः- विधानसभा निवडणुकीत बंजारा समाजाने शिवछत्र परिवाराला साथ दिली, प्रचाराच्या काळात आम्ही विकासकामांचा शब्द दिला होता, तो पूर्ण करण्याचे काम आता सुरु झाले असून सभामंडप, अंगणवाडी, शाळा बांधकाम, रस्ते, विज, पाणी अशा मुलभूत सुविधांसंदर्भातील विकासकामे सध्या अनेक तांड्यांवर सुरु आहेत. तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायती मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. गेवराई विधानसभा मतदारसंघातील कोणताही बंजारा तांडा विकासापासून वंचित राहणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. जांभळी तांड्याला जोडणाऱ्या एक कोटी रुपये किंमतीच्या रस्ता कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ठाकर आडगांव ते जांभळीतांडा या एक कोटी रुपये किंमतीच्या रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण, मौजे कुंभेजळगाव, राजपिंप्री, जोडवाडी येथील ६० लक्ष रुपये किंमतीच्या बंधाऱ्याचे, मौजे जोडवाडी व सैदापूर येथील २३ लक्ष रुपये किंमतीच्या अंगणवाडी बांधकामासह ९७ लक्ष रुपये किंमतीच्या पाणीपुरवठा योजनेचा भव्य शुभारंभ शनिवार, दि.२४ जानेवारी रोजी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, उपसभापती श्रीहरी पवार, माजी सभापती कुमारराव ढाकणे, जगन्नाथ काळे, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीराम आरगडे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष कालिदास नवले, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पांढरे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष सुभाष मस्के, बाजार समितीचे संचालक बाबुराव जाधव, खरेदी विक्री संघाचे सदस्य देवराव यमगर, सरपंच रविंद्र गाडे, विलास चव्हाण, परमेश्वर खरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ठिकठिकाणी माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे ग्रामस्थांनी भव्य स्वागत केले. अमरसिंह पंडित यांनी बंजारा समाजातील महिला व नागरिकांशी सुसंवाद साधला. विविध विकासकामांचे काम दर्जेदार करण्यात येतील त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी  केले. यावेळी चेअरमन शंकर पवार, विठ्ठल राठोड, जानू पवार, भानुदास महाराज राठोड, लहु सामजी, बाळु राठोड, सुभाष राठोड, जालिंदर राठोड, रोहिदास राठोड, अनिल पवार, कचरु पवार, लहू पवार, मोतिराम राठोड, विलास पवार, संजय पवार,पांडुरंग राठोड, बन्सी जाधव, नंदकुमार पवार, सरपंच सिद्धेश्वर काळे, शेषेराव पवार, सुधाकर कोकाट, आरुण कोकाटे साळिकराम चव्हाण परमेश्वर कोकाट, संदिपान कोकाटे, एकनाथ काळे शिवनाथ काळे, अच्युत कोकाट, सतिश चव्हाण, कालिदास चव्हाण यांच्यासह ठाकर आडगाव, जांभळी तांडा येथील नागरिक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button